Uddhav Thackeray News Saam Tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News: 'तेच तेज, तेच सळसळतं रक्त, तोच स्वाभिमान', ठाकरेंच्या हिंगोलीच्या सभेचा टीझर लॉन्च

Hingoli News: 'तेच तेज, तेच सळसळतं रक्त, तोच स्वाभिमान', ठाकरेंच्या हिंगोलीच्या सभेचा टीझर लॉन्च

साम टिव्ही ब्युरो

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा विरोधकांवर धडाडणार आहे. हिंगोलीत उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेचा टीझर ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आला आहे.

ही सभा हिंगोलीत रामलीला मैदानात दुपारी दोन वाजता होणार आहे. 'तेच तेज, तेच सळसळतं रक्त, तोच स्वाभिमान आणि तोच निष्ठावंतांचा जनसागर', या वाक्यांसह या टीझर व्हिडीओची सुरुवात होते. हिंदुत्वाचा खरा विचार ऐकायला मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असं आवाहन प्रोमोच्या माध्यमातून ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, येत्या रविवारी मराठवाड्यातील बीड, हिंगोली आणि परभणी या तीन ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या दिग्गज नेत्यांच्या सभा होत आहेत. बीडमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची सभा होणार आहे. (Latest Marathi News)

मागच्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची रॅली आणि सभा झाली होती, त्या सभेला प्रत्युत्तर म्हणून बीडमध्ये रॅली शक्तिप्रदर्शन दिसणार आहे. बीड शहरात रविवारी सायंकाळी रॅली आणि त्यानंतर सभा होणार आहे.

यातच हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर उद्धव ठाकरे यांचीही सभा होत आहे. या सभेला मराठवाड्यातून मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते नेते उपस्थित राहणार आहेत. तर परभणीमध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या रविवारी मराठवाड्यात राजकीय धुमशान पाहायला मिळणार आहे. तीनही ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे मराठवाड्यात रविवारी एकमेकांवर जोरदार तोफा धडाडणार असे दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT