कोल्हापुरातील सावकाराकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार; पीडितेच्या प्रसूतीनंतर खळबळ Saam tv
महाराष्ट्र

कोल्हापुरातील सावकाराकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार; पीडितेच्या प्रसूतीनंतर खळबळ

अल्पवयीन मुलीवर ६१ वर्षीय व्यक्तीने वारंवार बलात्कार करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उघडकीस आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर: अल्पवयीन मुलीवर ६१ वर्षीय व्यक्तीने वारंवार बलात्कार करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यामध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी हातकणंगले (Hatkanangle) पोलिसांनी संशयित नंदकुमार चंद्रकांत निगवे याला अटक (Arrested) करण्यात आली आहे. नंदकुमार चंद्रकांत निगवे हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील दर्गा परिसरात राहत होते.

हे देखील पहा-

पीडित मुलीच्या इच्छेविरुद्ध त्याच्या नव्याने बांधलेल्या इमारतीच्या शेडमध्ये वारंवार तिच्यावर बलात्कार (sexual assualt) केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ती गर्भवती राहिल्यावर तिच्यावर सांगलीमध्ये (Sangli) उपचार सुरू आहेत. पीडितेने बाळंत होऊन एका मुलीला जन्म दिला आहे. बाळाच्या जन्मानंतर नातेवाईकांनी सांगली मधील संजयनगर पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याविषयी तक्रार नुकतीच हातकणंगले पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. हातकणंगले पोलिसांनी नंदकुमार निगवे याला अटक केली आहे. नंदकुमार निगवे यांनी खासगी सावकारीतून अनेक कामे केल्याचा दावा देखील केला जात आहे. त्याच्याविरुद्ध हातकणंगले पोलिस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल झाले असून संतप्त ग्रामस्थांनी त्याला मारहाण (Beating) देखील केली होती. त्याला न्यायालयामध्ये (court) हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tyres Black Colour : वाहनांचे रंग आणि डिझाइन बदलते, मग टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या रंजक कारण

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

महायुतीत बंडखोरी? सामंतांच्या निकटवर्तीय नेत्यानं थोपटले दंड; शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का

Monday Horoscope : पैसा, करिअर आणि व्यवसायात मोठी संधी; ‘या’ 6 राशींचे नशीब उजळणार

तुम्हीही हेल्थ इन्शुरन्स घेतलाय? मग ही बातमी नक्की वाचा! 1 जानेवारीपासून नवा नियम येणार

SCROLL FOR NEXT