NCP Nawab Malik  Saam TV
महाराष्ट्र

Prithviraj Chavan: मलिकांना जामीन... हे बरेच काही सूचक आहे, पृथ्वीराज चव्हाणांचा अजित पवारांवर राेख? (पाहा व्हिडिओ)

SC grants bail to NCP leader Nawab Malik : यामध्ये राजकीय काही नाही असेही भुजबळांनी स्पष्ट केले.

संभाजी थोरात

Nawab Malik News : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विशेषत: काॅंग्रेसच्या नेत्यांनी मलिकांना जामीन मंजूर हाेणे म्हणजे पुन्हा एक राजकीय खेळी आहे की काय अशी शंका व्यक्त करीत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काॅंग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावर आराेग्य विषयक अडचणींमुळे मलिकांना जामीन मंजूर झाल्याचे नमूद केले.

सर्वाेच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना नुकताच जामीन मूंजर केला आहे. दरम्यान यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी साम टीव्हीशी बाेलताना मालिकांना जामीन देण्यामागे राजकारण असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

वाब मालिकांना राजकीय दबाव आणून भूमिका घ्यायला भाग पाडले असावे असा राजकीय संशय असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. सीबीआय यंत्रणांनी आता जामीनला विरोध का केला नाही असाही प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

काॅंग्रेसच्या आमदार यशाेमती ठाकूर यांनी देखील नवाब मलिक यांना आधीच जामीन दयायला पाहिजे होता असे म्हटलं हाेते. त्या म्हणाल्या दबावतंत्र, सेंट्रल एजन्सीचा गैरवापर अशा अनेक गाेष्टी हाेत आहेत. त्या बरोबर नाहीत.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) छगन भूजबळ यांनी मलिकांना आराेग्य विषयक अडचणी असल्याने जामीन मंजूर झाला आहे. दाेन महिन्यांसाठी त्यांना आराेग्य सुविधेसाठी ही प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे यामध्ये राजकीय काही नाही असेही भुजबळांनी स्पष्ट केले.


Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

Kitchen Hacks : पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा जात नाहीये? 'या' ट्रिक्स वापरून होतील लख्ख

Fort : किल्ल्यात दडलाय सोन्याचा खजिना? रहस्य शोधण्यासाठी आजही पर्यटकांची गर्दी

SCROLL FOR NEXT