हा मेळावा भगवान बाबांच्या भक्ताचा- प्रीतम मुंडे Saam Tv
महाराष्ट्र

हा मेळावा भगवान बाबांच्या भक्ताचा- प्रीतम मुंडे

सावरगाव मधील दसऱ्या मेळाव्यानिमित्त भाजप नेत्या पकंजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड : सावरगाव मधील दसऱ्या मेळाव्यानिमित्त भाजप नेत्या पकंजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. आपला आवाज मुबंई पासून ते दिल्लीपर्यंत पोहोचत आहे. सावरघाट गावाच्या गावकऱ्यांचे मी आभार व्यक्त करत आहे. आज या मेळाव्याला येत असताना हा आज मेळावा होईल, का नाही अशी शंका माझ्या मनामध्ये काहीशी येऊन गेली होती.

हे देखील पहा-

मात्र, आता जमलेला जनसमुदाय पाहिल्यानंतर हा खरा दसरा मेळावा असल्याचे प्रतित होत आहे. विजयादशमी निमित्त मी सर्वांना सुभेच्छा देते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून येणारा जनसमुदाय या ठिकाणी अधिक लक्षवेधी ठरत आहे. आपला मेळावा कोणत्याही प्रकारचा राजकीय मेळावा नाही, तर राज्यातील शोषितांचा मेळावा आहे. यामुळे हा मेळावा खऱ्या अर्थाने भगवान बाबांच्या भक्तांचा मेळावा आहे.

ज्या कोणाला शंका असेल, त्यांनी या ठिकाणी जमलेला जनसमुदाय एकदा येऊन पाहावा. मी मुंडे साहेबांकडून आशिर्वाद घेऊन निघाले, तेव्हा त्यांना मी फक्त एकच मागणं मागितले की, समाजामध्ये आता निर्माण झालेली नकारात्मता संपावी. हा कोणत्या आघाडीचा स्टेज नाही. कीतीही अग्रह तुम्ही केला तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत. यावेळी बोलताना प्रीतम मुडेंनी रोहित पवारांना अप्रत्क्षपणे टोला लगावला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharat Gogawale: मंत्री भरत गोगावले रोहा पालिका मुख्यधिकाऱ्यांवर हक्कभंग आणणार, काय आहे संपूर्ण प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस

Jio Prepaid Plans: जिओची धमाकेदार ऑफर! अतिरिक्त डेटा अन् एंटरटेनमेंटची मेजवानी

शिवेंद्रराजे यांनी सातारा गॅझेटवर केला खुलासा; म्हणाले... VIDEO

Shocking : ९ मुले, तिघे विवाहित; नातवंडांशी खेळण्याच्या वयात महिला २० वर्षे लहान बॉयफ्रेंडसोबत पळाली

SCROLL FOR NEXT