एसटीवरून प्रीतम मुडेंनी केली महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका...  विनोद जिरे
महाराष्ट्र

एसटीवरून प्रीतम मुडेंनी केली महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका...

एसटी मध्ये प्रवास करणाऱ्या सर्वांचे आयुष्य धोक्यात आहे

विनोद जिरे

बीड : भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी आज थेट एसटीच्या कॅबिनची पाहणी केली आहे. यावेळी पाहणी करत असताना त्यांनी एसटीला आलेल्या अवकळेचा बुरखाच फाडला आहे. अशा एसटी मध्ये प्रवास करत असताना, चालक वाहनांसह एसटी मध्ये प्रवास करणाऱ्या सर्वांचे आयुष्य धोक्यात आहे हे अतिशय अक्षम्य दुर्लक्ष आहे, अशी टीका देखील यावेळी प्रीतम मुंडे यांनी सरकारवर केली आहे.

हे देखील पहा-

त्या म्हणाल्या, की कर्मचाऱ्यांसह आज एसटीची स्थिती भयंकर वाईट झाली आहे. यामुळे मी व्यथित झाले आहे. आज वाईट वाटते, की या अगोदर या प्रश्नांकडे आपलं का लक्ष गेलं नाही? कदाचित आमचे सरकार असताना याकडे आमचे लक्ष गेले असते, तर कदाचित परिस्थिती यापेक्षा वेगळी झाली असती.

आज बसमध्ये आल्या आल्या मी विचारले, की ही बस चालू परिस्थितीमधील बस आहे का? कारण भंगारमध्ये असल्यासारखी परिस्थिती या बसची आहे. असे म्हणत त्यांनी एसटीच्या कॅबिन मधील अवकळा दाखवून, या दुरावस्थेतचा बुरखा फाडला आहे. दरम्यान थेट एसटीच्या कॅबिनमधून खासदार प्रीतम मुंडे यांनी पाहणी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT