PM Modi Mother Death Saam TV
महाराष्ट्र

PM Modi Mother Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे निधन; महाराष्ट्रातील नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी पंतप्रधानांच्या आईसाठी ट्विटवर श्रद्धांजली वाहिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

PM Modi Mother Death : पंतप्रधान नरेंद्रमोदी यांच्या आईचे निधन झाले आहे. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. मोदी यांच्या आई हिराबेन मोदी या गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्याने रुग्णालयात उपचार घेत होत्या. आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान अहमदाबादला रवाना झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी पंतप्रधानांच्या आईसाठी ट्विटवर श्रद्धांजली वाहिली आहे. (PM Modi Mother Death)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत लिहिले आहे की, " पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून अतीव दुःख झाले. आम्ही सर्व नरेंद्र मोदीजी यांच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या मातोश्रींच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली."

"आई पंतप्रधान @narendramodi होय, त्यांच्या आदरणीय आई हिराबेन मोदी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. आई सोबत नसण्यापेक्षा या जगात दुसरे दु:ख नाही. यावेळी आम्ही तुम्हा सर्वांप्रती शोक व्यक्त करतो. पंतप्रधान आणि कुटुंबातील सर्व सदस्यांसह आम्ही आहोत.", असे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं ट्विट, " पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या आई श्रीमती हिराबेन मोदी यांचं निधन झाल्याचे समजुन अतिशय दु:ख झाले. त्या प्रेमळ व मनमिळाऊ वात्सल्यमूर्ती होत्या. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या रुपाने त्यांनी देशाला महान सुपुत्र दिला. त्या कृतार्थ जीवन जगल्या. ईश्वर दिवंगत श्रीमती हिराबेन यांच्या आत्म्याला श्रीचरणी स्थान देवो, ही प्रार्थना करतो व आपल्या शोकसंवेदना आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना कळवतो." असे म्हटले आहे.

"माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाबेन मोदी यांचे निधन झाल्याचं समजून दुःख झालं. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला. मातृवियोगाचं दुःख मोठं असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो.", असे ट्विट करत अजित पवारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, "हिराबेन मोदी यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झाले - पंतप्रधानांच्या मातोश्री. नरेंद्र मोदी जी मोदी परिवारासोबत माझे विचार आणि प्रार्थना. त्यांना शांती लाभो. विनम्र श्रद्धांजली."

"पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मातोश्री हिराबेन यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. मोदी साहेबांसारख्या सुपुत्राला जन्म देणाऱ्या या माऊलीच्या वाट्याला शंभर वर्षे कृतार्थ जीवन आलं. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, भावपूर्ण श्रद्धांजली!", असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

नवनीत राणा यांनी देखील श्रद्धांजली वाहत लिहिले आहे की, "माननीय पंतप्रधान श्री. श्री नरेंद्र मोदीजी आपल्या आदरणीय आईच्या निधनाने खूप दुःख झाले. या दुःखाच्या प्रसंगी मी पंतप्रधान आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करते. परमेश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या पावन चरणी स्थान देवो. ओम शांती!"

" नरेंद्रभाई, तुमच्या आईच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले. आयुष्यात कधीही भरून न येणार्‍या व्यक्तीचे हे नुकसान आहे! कृपया तिच्या नुकसानाबद्दल माझे प्रामाणिक शोक स्वीकारा. आईच्या आत्म्याला चिरशांती लाभो.", असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

" पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांच्या निधनाचे वृत्त समजले. आम्ही सर्व त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत.ईश्वर हिराबेन यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो व या दुःखातून सावरण्याकरिता पंतप्रधान श्री.मोदी यांना शक्ती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली!", असं ट्विट श्रिकांत शिंदे यांनी केलं आहे.

"पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मातोश्री हिराबेन यांचे आज दुःखद निधन झाले. या मातेला भावपुर्ण श्रध्दांजली! मातोश्रींच्या निधनाचे हे प्रचंड मोठे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर मोदीजी व कुटुंबीयांना देवो." असं ट्विट करत अनिल देशमुखांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी श्रद्धांजली वाहत लिहिले की, "आईचे छत्र हरपणे या सारखे अनाथपण नाही. आई जाण्याचे दुःख मोठे आहे.पंतप्रधान @narendramodi जी यांच्या आई हिराबेन यांच्या दुःखद निधनाने त्यांच्या कुटुंबीयावर आघात झाला आहे.ईश्वर मातोश्री हीराबेन यांच्या आत्म्यास शांती देवो. मोदी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. "

आम्ही सर्व पंतप्रधान @narendramodi जी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत." मंत्री बाळासाहेब थोरातांनी अशी श्रद्धांजली वाहिली आहे.

" पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या आदरणीय मातोश्री हिराबेन मोदी यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. हिराबेन आणि मोदीजी हे वर्षानुवर्षे आई-मुलाच्या प्रेमाचे अनोखे उदाहरण आहेत. मोदीजी, आईचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील. हिराबेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली!" असे ट्विट प्रविण दरेकरांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Pune Accident: जेजुरीत अपघाताचा थरार! पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना ट्रकने चिरडलं, ४ जणांचा मृत्यू

गरमा गरम चहासोबत खा पोहा कचोरी, घरी बनवण्याची सोपी रेसिपी

Kidney stone symptoms: सतत पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका; किडनी स्टोन झाल्यावर शरीर देत असलेली ही 8 लक्षणं ओळखा

Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात हत्याकांडाचा थरार, डोक्यात दगड घालून तरुणाला जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT