Pm Narendra Modi Saam Tv
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या महाराष्ट्र दौरा, पुणे पोलिसांनी दिले 'हे' आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १४ जून रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या १४ जून रोजी राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. देहू येथील जगतगुरु संत तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन त्यांच्याहस्ते होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी (Police) कडेकोट बंदोबस्त ठेवला असून पुणे जल्हाधिकारी कार्यालयाकडूनही कायदा व सुरक्षितता राखण्यासाठी आदेश जारी करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे ड्रोन, पॅराग्लायडींग (Paragliding) , हॉट बलून सफारी, मायक्रोलाईट, विमाने अशा प्रकारची अवकाश उड्डाणे करण्यास मनाई आदेश लागू केले आहेत. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh) यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त हे मनाई आदेश लागू केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर मंबईकडे रवाना होणार आहेत. सायंकाळी पावणेपाचला पंतप्रधान मोदी मुंबईमधील जलभूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचे उद्घाटन करतील. त्यानंतर वांद्रे कुर्ला कॉम्पेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होतील. मुंबईतील जलभूषण इमारत १८८५ पासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृ निवासस्थान आहे.या इमारतीचे आयुर्मान संपल्याने ती इमारत नव्याने बांधण्यात आलीय.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

Maharashtra News Live Update:बारामतीत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन; शारदा प्रांगणात मुक्काम

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

SCROLL FOR NEXT