Prime Minister Modi Saam Tv
महाराष्ट्र

PM Modi Maharashtra: पीएम मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; १३०० कोटी रुपयांच्या रेल्वे प्रोजेक्टचे उद्घाटन, शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार २१ हजार कोटी रुपये

Prime Minister Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते यवतमाळला भेट देणार आहेत. यवतमाळ येथील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवतील. तसेच रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.

Bharat Jadhav

PM Modi Maharashtra visit Inauguration Rs 1,300 Crore Railway Project:

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.यवतमाळ येथील जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी १३०० कोटी रुपयांचे रेल्वे प्रोजेक्टचे उद्घाटन करणार आहेत. तर पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसह राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यता पैसे पाठवणार आहेत.(Latest News)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १६ व्या हप्त्याची रु. २१,००० कोटींहून अधिक रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. याबरोबरच ३ लाख कोटींहून अधिक रक्कम ११ कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना ही रक्कम दिली जाणार आहे. यावेळी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चा सुमारे ३८०० कोटी रुपयांचा २रा आणि ३रा हप्ता देखील वितरित करण्यात येणार आहे. ज्याचा लाभ महाराष्ट्रातील सुमारे ८८ लाख पात्र शेतकऱ्यांना मिळेल.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील ५.५ लाख महिला बचत गटांना (SHGs) रु. ८२५ कोटी इतका फिरता निधी वितरित करतील. ही रक्कम भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियाना (NRLM) अंतर्गत प्रदान केलेल्या रकमे व्यतिरिक्त आहे. हा निधी बचत गटाअंतर्गत फिरत्या तत्त्वावर कर्ज द्यायला प्रोत्साहन देण्यासाठी दिले जाते, जेणे करून ग्रामीण पातळीवर महिलांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन मिळेल, आणि गरीब कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न वाढेल.

महाराष्ट्रातील एक कोटी आयुष्मान कार्ड वितरणाचा शुभारंभ करतील. सरकारच्या कल्याणकारी योजना कानाकोपऱ्यातील जनतेपर्यंत पोहोचवून १०० टक्के पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

SCROLL FOR NEXT