Sharad Pawar  Saam TV
महाराष्ट्र

राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीबाबत शरद पवारांचं मोठ विधान, म्हणाले...

येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक (Presidential Election) जाहीर केली आहे. त्यानुसार १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदावर कोणता उमेदवार असावा यासाठी सत्ताधारी (BJP) आणि विरोधकांमध्ये बैठका सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) देशाचे राष्ट्रपती व्हावे अशी चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्यान, आता शरद पवार यांनी राष्ट्रपदी पदाच्या उमेदवारीबाबत भाष्य केलं आहे. (NCP Sharad Pawar Latest News)

आपण राष्ट्रपती पदाच्या स्पर्धेत नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा आहे. यादरम्यान मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनी आपण विरोधकांचे उमेदवार नसू असं स्पष्ट केलं आहे. “मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही,” असं शरद पवारांनी यावेळी उपस्थित कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं असल्याची माहिती आहे.

युपीएकडून राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांचे नाव निश्चित झाले तर आमचे समर्थन असणार, असं वक्तव्य अगदी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलं होतं. त्यानंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सुद्धा शरद पवारांचं नाव सूचवलं असल्याचं समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच शरद पवार यांचे नाव समोर केले आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली होती.

दरम्यान, टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आता शरद पवारांनी आपण या स्पर्धेत नाही असं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार विरोधकांमध्ये चर्चा व्हावी यासाठी पुढाकार घेणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. येत्या 15 जून रोजी विरोधकांची दिल्ली येथे बैठक होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुलाम नबी आझाद यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसने पसंती दर्शवली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगाने 18 जुलै रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया 21 जुलै रोजी पार पडेल.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT