Big News | धुतलेले कपडे नसल्याने गर्भवतीला परत पाठवले! पहा Video  Saam Tv
महाराष्ट्र

Big News | धुतलेले कपडे नसल्याने गर्भवतीला रुग्णालयातून परत पाठवले! पहा Video

बाळंतपणासाठी लागणारे रुग्णालयातील कपडे धुतलेले नसल्याच्या कारणावरून एका गर्भवती महिलेला चक्क वणीच्या ग्रामीण रुग्णालयातून चंद्रपूरला पाठवल्याची संतापजनक घटना पुढे आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- संजय राठोड

यवतमाळ - बाळंतपणासाठी लागणारे रुग्णालयातील कपडे धुतलेले नसल्याच्या कारणावरून एका गर्भवती महिलेला यवतमाळ मधील वणीच्या ग्रामीण रुग्णालयातून चंद्रपूरला पाठवल्याची संतापजनक घटना पुढे आली आहे. वणी तालुक्यातील वारगाव येथील रंजना नितेश कोल्हे ही महिला बाळंतपणासाठी वणीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल झाली. तिला प्रसवकाळा सुरू झाल्याने बाळांतपणाची तयारी करण्यात आली. मात्र, कपडे निर्जंतूक नसल्याने गर्भवती महिलेला चंद्रपूरला जा असे रुग्णालय प्रशासकडून सांगण्यात आल्याची धक्कादायक घटना वणीच्या ग्रामीण रूग्णालयात घडली.

हे देखील पहा :

नैसर्गिकरित्या बाळांतपण करताना जर शस्त्रक्रियेची गरज पडली. तर त्यासाठी लागणारे कपडे अगोदर धुवून निर्जंतुक करावे लागतात. मात्र, या प्रक्रियेसाठी लागणारे रूग्णालयातील कपडेच धुवून नसल्याचे रूग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यातच गर्भवती रंजना कोल्हे या महिलेला प्रसवकळा ही सुरू झाल्या. त्यामुळे ऐनवेळी तिला वणी ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी भर्ती न करता चंद्रपूरला ला जाण्यास सांगण्यात आले. हा सर्व प्रकार शिवसेना पदाधिकारी राजू तुराणकर ह्यांना समजल्या नंतर त्यांनी आधी गर्भवती महिलेला चंद्रपूर ला प्रसूती करता हलविले आणि त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचा चांगलाच समाचार घेतला.

संतापजनक घटना वणी ग्रामीण रूग्णालयात घडल्यानंतर राजू तुराणकर यांनी आरोग्य संचालक, उपायुक्त, व जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन करून घडलेला प्रकाराची माहिती देत या प्रकरणात दोषींविरुद्ध कडक कारवाई ची मागणी केली. दरम्यान, दोषींविरुद्ध कारवाई न केल्यास जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयापुढे आंदोलनाचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे संबधित कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई होते या कडे लक्ष्य लागले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

SCROLL FOR NEXT