Solapur NEws  Saam TV
महाराष्ट्र

Solapur Siddheshwar Yatra: यावर्षी नैसर्गिक आपत्तीचे संकेत, सोलापुरातील श्री सिद्धेश्वर यात्रेतील भाकणुकीतील अंदाज

वासराने मूत्र आणि मल विसर्जन केले. यावरून भरपूर पाऊस पडणार असल्याचे भाकीत हिरेहब्बू यांनी केले.

साम टिव्ही ब्युरो

>> विश्वंभर लिमये

सोलापूर : सोलापुरात श्री सिद्धेश्वर यात्रेत झालेल्या भाकणुकीत नैसर्गिक आपत्तीचे संकेत दिसत असल्याचे मत मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी व्यक्त केले. तसेच यंदा मुबलक पाऊस पडणार असून, जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर राहणार असल्याचे अंदाज देखील मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी व्यक्त केले.

सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील होम विधीचा सोहळा संपन्न झाला. होमविधीचा सोहळा आटोपल्यावर रात्री मानाचे सातही नंदीध्वज मिरवणुकीने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहासमोर विसावले. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला.

दिवसभर उपाशी ठेवलेल्या देशमुखांच्या शेतातील वासराला भाकणूकस्थळी आणण्यात आले. वासरु येताच राजशेखर देशमुख यांनी वासराची पूजा केली. सुरुवातीलाच वासराने मूत्र आणि मल विसर्जन केले. यावरून भरपूर पाऊस पडणार असल्याचे भाकीत हिरेहब्बू यांनी केले. वासरू सुरवातीपासून बिथरले होते.नैसर्गिक आपत्तीचे संकेत असल्याची माहिती मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली. (Latest Marathi News)

मागील 25 वर्षात मी पहिल्यांदाच वासराला इतक्या आक्रमक रूपात पाहिले आहे.हे नैसर्गिक आपत्तीचे लक्षण आहे. 1993 साली किल्लारीच्या भूकंपाआधी देखील वासरू अशाच प्रकारे बिथरले होते.त्यानंतर पाहिल्यांदाच अशा पद्धतीने वासरू बिथरले असून जोरजोरात ओरडत होते.त्यामुळे हे नैसर्गिक आपत्तीचे संकेत देणारे आहे, अशी प्रतिक्रिया मानकरी हिरेहब्बू यांनी दिली.

दरम्यान दिवसभर उपाशी असलेल्या या वासरासमोर गूळ, गाजर, बोरं, खोबरं, खारीक, पान, सुपारी आणि विविध प्रकाराचे धान्य ठेवण्यात आले. मात्र वासराने कशालाच स्पर्श केले नाही.यावरुन सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहतील, असा अंदाज मानकरी हिरेहब्बू यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Expressway: बदलापूरला मिळणार नवा महामार्ग, ६०० किमीचा प्रवास एका झटक्यात होणार

Shivali Parab Photos : "तुझ्या डोळ्यांच्या सागरात...", शिवालीचं हटके फोटोशूट पाहून चाहत्यांचे भान हरपले

पायांना सतत मुंग्या, क्रॅम्प येतात? 'ही' कॅन्सरची लक्षणे तर नाहीत ना? दुर्लक्ष करू नका

Maharashtra Live News Update: पुण्यात आज महाविकास आघाडीची बैठक

लग्नसराईत सोनं - चांदीला चकाकी, २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या दरात किती रूपयांची वाढ? वाचा लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT