पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाची पाहणी करण्यासाठी प्रविण दरेकरांचा उद्या महाड-पोलादपूर दौरा Saam Tv
महाराष्ट्र

पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाची पाहणी करण्यासाठी प्रविण दरेकरांचा उद्या महाड-पोलादपूर दौरा

महापूरामुळे हजोरा नागरिक विस्थापित झाले असून त्यांच्या पुनर्वसनाच्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी दरेकर उद्या महाड-पोलादपूर दौरा करणार आहेत.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उद्या बुधवार ४ ऑगस्ट २०२१ रोजी महाड व पोलादपूरच्या दौ-यावर जाणार आहेत. या भागात आलेल्या पूरामुळे हजोरा नागरिक विस्थापित झाले असून त्यांच्या पुनर्वसनाच्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी दरेकर उद्या येथे जाणार असल्याच समजत आहे.Pravin Darekar to visit Mahad-Poladpur tomorrow to inspect flood victims' rehabilitation

हे देखील पाहा-

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर हे सकाळी ९.४५ वाजता पुरग्रस्तांसाठी महाड शहर येथे सुरु केलेल्या भाजपा सेवा कार्य (किचन) च्या ठिकाणी भेट देणार आहेत. त्यानंतर सकाळी- १०.१५ वा. काळीजकोंड, ता.महाड येथील नुकसानग्रस्त भागाची पहाणी करतील. सकाळी ११.१५ वा. दरेकर पोलादपूर येथील सुतारपाडा, गोवले, केवनाळे येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी पाहाणी करणार असून पूरामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. सायंकाळी ४ वा. मुसळधार पावसामुळे महाड शहर व बाजूच्या भागात झालेल्या नुकसानीसंदर्भात उपविभागीय अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्या समवेत महाड येथील शासकीय विश्रामगृह बैठक घेऊन चर्चा करणार आहेत.

महाड-रायगड परिसरात झालेल्या मुसळघार पर्जन्यवृष्टीत संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी दरेकर सर्वप्रथम तेथे पोहोचले. त्यामुळे येथील मदत कार्याला वेग मिळू शकला.त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीच्या व्यवस्थेची पाहणी करणार आहेत.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT