narayan rane 
महाराष्ट्र

साहेबांना अटक झाल्यास भाजप कार्यकर्ते स्वतःला अटक करुन घेतील

Siddharth Latkar

रत्नागिरी : नारायण राणेंना अटक झाल्यास महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते स्वतःला अटक करुन घेतली असे भाजपचे नेते प्रमाेद जठार pramod jathar यांनी नमूद केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे narayan rane यांनी महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठकरे uddhav thackeray यांच्यावर टीका केली. त्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. राज्यातील नाशिक आणि पुणे जिल्ह्यात राणेंच्या वक्तव्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्या अनुषंगाने नाशिक आणि पुणे पाेलिसांचे पथक मंत्री राणेंना अटक करण्यासाठी रवाना झाले आहेत.

दरम्यान भाजप नेते प्रमाेद जठार यांनी महाराष्ट्र सरकार जाणून बुजून सुड उगविण्याचे काम करत आहे. साेमवारी आम्हांला दाै-याच्या वेळेस सभागृह अथवा जागा निश्चित करण्यासाठी जागाही मिळत नव्हत्या. आज आणि उद्या मंत्री राणे यांचा रत्नागिरीची दौरा असताना देखील पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांची बैठक लावली. राणे साहेब जे बोलले ते ठाकरी भाषेत बोलले आहेत. या भाषेवरुन गुन्हा दाखल हाेणार असेल तर सर्व दसरा मेळाव्यातील भाषणांवर गुन्हा दाखल करावा लागेल असेही जठार यांनी नमूद केले.

राणे साहेबांच्या ठाकरी भाषेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच भाषेत उत्तर द्यावे असे आव्हान जठार यांनी दिले आहे. राणे साहेबांना अटक झाली तर राज्यातील भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता स्वतःला अटक करुन घेईल असेही जठार यांनी स्पष्ट केले. दरम्यान रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्ते चिपळुणच्या दिशेने रवाना झाल्याने पाेलिसांनी जिल्ह्यातील कायदा व सुवस्था बिघडू नये यासाठी मास्टर प्लॅन केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT