Prakash Ambedkar Health Update Saam Tv
महाराष्ट्र

Prakash Ambedkar: निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालवली; रक्तात आढळली गाठ

Prakash Ambedkar Health Update: प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती खालवली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रकाश आंबेडकरांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालायत दाखल करण्यात आलंय.. मात्र आंबेडकरांची प्रकृती कशी आहे? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

तर प्रकाश आंबेडकरांची अँजिओग्राफी करण्यात आल्याची माहिती सुजात आंबेडकरांनी दिलीय. तर प्रकाश आंबेडकरांची प्रकृती स्थिर आहे. त्यापार्श्वभुमीवर प्रकाश आंबेडकरांनी काळजी घेण्याची विनंती मनोज जरांगेंनी केलीय.

पुना हॉस्पिटलमध्ये प्रकाश आंबेडकरांवर अँजिओग्राफी करण्यात आलीय. अँजिओग्राफीनंतर प्रकाश आंबेडकरांवर अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे पुढील प्रकाश आंबेडकरांना पुढील 2 ते 3 दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागणार आहेत.

तर या काळात वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर या प्रचाराची जबाबदारी सांभाळणार आहेत. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात प्रकाश आंबेडकरांना रुग्णालयात दाखल करावं लागल्याने त्यांच्या आक्रमक प्रचारावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर उपचार घेऊन पुन्हा मैदानात कधी उतरणार? याकडे लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT