Prakash Ambedkar Saam TV
महाराष्ट्र

Prakash Ambedkar on Reservation: १८ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार; प्रकाश आंबेडकर यांची मोठी घोषणा

Prakash Ambedkar on OBC Reservation: १८ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी घोषणा केली.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एकीकडे मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध आहे. या आरक्षणाच्या मुद्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणासाठी १८ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले.

प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हणाले, ' आम्ही १८ जुलैपासून ओबीसी बचाव यात्रेला सुरुवात करणार आहोत. कोल्हापूर ते छत्रपती संभाजीनगर असा प्रवास असेल. अनेक ओबीसी संघटनांनी विनंती केली की, ओबीसींचा लढा हातात घ्या. आताची परिस्थिती भयानक होत आहे. नामांतराची आठवण येईल, असे सुरु आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद श्रीमंत मराठ्यांनी लावला आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांना भीती आहे'.

'मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरु केलं आहे. दुसऱ्या बाजूस सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला सर्व मराठा नेते, एनसीपी, काँग्रेस आणि ठाकरे गटाचे कुणीच उपस्थित नव्हते. ठाकरे गट, काँग्रेस आणि एनसीपीपर्यंत जोपर्यंत भूमिका मांडत नाहीत. तोपर्यंत तोडगा निघणार नाही. सामाजिक संघटना घेऊन २५ जुलैपासून दादर चैत्यभूमीवरून सुरुवात करायची. २६ जुलैपासून शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती. त्यामुळे शाहू महाराजांना नतमस्तक होऊन यात्रा काढण्याचे ठरवले आहे. या यात्रेची सांगता ७ किंवा ८ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे, असे आंबेडकरांनी सांगितले.

'मनोज जरांगे पाटील यांचे गरीब मराठ्यांसाठी आंदोलन सुरु आहे. सत्ता ही श्रीमंत मराठ्यांची आहे. ते गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू देत नाहीत. सगेसोयरे हे भेसळ आहे. आताच्या मिळालेल्या नोंदीवरून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत. ती रद्द करावीत. तपसाले गेले नाहीत. त्यांना स्वत: अर्ज केलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडच्या निजामपुरमध्ये दुषित पाण्याचा पुरवठा

MLC Election : ठाण्यात शिंदेंच्याच शिवसेनेचा विजय निश्चित, एक फोन अन् पवारांची अचानक माघार

Heat stroke symptoms: हीट स्ट्रोक की हार्ट अटॅक...! कसा ओळखाल दोघांमधील फरक?

MLC Election Update : 'हा' उमेदवार जळगावात सर्वात श्रीमंत, किती आहे संपत्ती? आकडे वाचून फुटेल घाम

money laundering case : राज कुंद्रा यांना मोठा दिलासा; कोर्टाकडून परदेश प्रवासाची परवानगी

SCROLL FOR NEXT