भाजपच्या शिवाजी कर्डिलेंच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेच्या जागेसाठी भाजपनं अक्षय कर्डिंलेंना उमेदवारी जाहीर केली... मात्र या मतदारसंघातून माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंही पोटनिवडणुक लढवण्यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळालं होतं... मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपनं नेहमीप्रमाण आपले पत्ते बाहेर काढले...
अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर तनपुरेंनी माघार घेत असल्याचं जाहीर केलं.
मात्र पवारांनी भाजपच्या खेळीला शह देण्यासाठी आधीच डाव टाकला होता. राहुरीत अखेरच्या क्षणी काय घडलं ते पाहूय़ात....
चव्हाण आणि विखेंची तनपुरेंशी बंद दाराआड चर्चा झाली...सूत्रांच्या माहितीनुसार, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तनपुरेंशी फोनवर संवाद साधला... तर दुसरीकडे शरद पवारांनी राहुरी पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे आणि गोविंदराव मोकाटे यांच्यासाठी 2AB फॉर्म पाठवले..कारण प्राजक्त तनपुरे मागील काही काळापासून हिंदुत्वाच्या मुद्दयावरून आक्रमक भूमिका घेत असून त्यांची भाजपशी जवळीक वाढलीय. आणि याची शरद पवारांना कल्पना असल्यामुळे त्यांनी सावध पवित्रा घेतला आणि राष्ट्रवादीच्याच मोकांटेचा निव़डणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला.
त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तनपुरेंवर कार्यकर्त्यांचा दबाव होता,मात्र ते निवडणुक लढवण्यास इच्छुक नसल्याचं स्पष्ट केलयं..खरतर राहुरी विधानसभेतच 2019 साली प्राजक्त तनपुरेंनी शिवाजीराव कर्डिलेंचा पराभव केला होता... त्यामुळे राहुरीत तनपुरेची ताकद आहे....मात्र आता तनपुरेंच्या माघारीनंतर राहुरीत अक्षय कर्डिले विरुद्ध गोविंदराव मोकाटे अशी लढत होणार आहे... त्यामुळे तनपुरेंच्या माघारीचा फायदा भाजपला होणार की पवारांच्या पक्षाचे गोविंदराव मोकाटे बाजी मारणार? याकडे राज्याचं लक्ष लागलयं...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.