buldhana  
महाराष्ट्र

नगराध्यक्षांसह मुख्याधिका-यांवर गुन्हा दाखल करा; 'प्रहार'

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा buldhana जिल्ह्यातील शेगांव शहरात रविवारी गणपती विसर्जनादरम्यान पालिकेच्या वतीने चौकाचौकात वाहने लावून त्यात गणपतीची मूर्ती विसर्जनासाठी पालिका कर्मचाऱ्यांकडून स्वीकारण्यात आल्या. यावेळी विसर्जनासाठी पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आलेल्या होत्या. त्या पाण्याच्या टाक्या ह्या घाणीने भरलेल्या होत्या. यामुळे अस्वच्छ माखलेल्या टाक्यांमध्ये या गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचा हा प्रकार म्हणजे पालिकेने गणपतीची विटंबना केल्याचा आरोप व निषेध करीत प्रहार संघटनेच्या वतीने आज (सोमवार) गांधी चौकात नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करावे अशी मागणी आंदाेलकांनी केली.

पालिकेने रविवारी गणपती विसर्जनासाठी कृत्रिम पाण्याची व्यवस्था केली होती यामध्ये शहरातील विविध चौकांमध्ये मिनीडोअर लावून त्यामध्ये पाण्याच्या टाक्या ठेवून नागरिकांना या टाक्यांमध्ये गणपती विसर्जित करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार नागरिकांनी आपल्या घरगुती गणपतींचे विसर्जन नाही केले मात्र या टाक्यांमध्ये गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले त्या टाक्यांचे पाणी घाण होते या शिवाय प्लास्टिकच्या टाक्या ही अस्वच्छ असल्याने गणपती मूर्ती यांची विटंबना झाल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेने आज आंदोलन केले.

हे आंदाेलन निलेश घोंगे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या समोर करण्यात आले. यावेळी आंदाेलकांनी नगराध्यक्ष शकुंतलाबाई बूच आणि मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन यावेळी करण्यात आले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT