Kolhapur, Ambabai, mahalaxmi temple
Kolhapur, Ambabai, mahalaxmi temple saam tv
महाराष्ट्र

Ambabai : अंबाबाई वज्रलेप प्रकरण; केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आराेप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- रणजित माजगावकर

Kolhapur Ambabai : केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी काेल्हापूरच्या (kolhapur) अंबाबाई (kolhapur ambabai) मूर्तीशी छेडछाड केली असा गंभीर आरोप श्रीपूजक गजानन मुनीश्‍वर यांचे वकिल गांधी यांनी केला आहे. कोणत्याही परवानगी शिवाय चेहऱ्यावर यापूर्वी लावलेला लेपचा काही थर काढून टाकला गेला आहे असे वकील गांधींनी नमूद केले. (Breaking Marathi News)

कोल्‍हापूर येथील साडेतीन शक्‍तीपीठांपैकी एक असलेल्‍या श्री महालक्ष्मी (kolhapur mahalaxmi) देवीच्‍या मूर्तीवर राज्‍य पुरातत्‍व विभागाने वज्रलेप केला आहे. मूर्तीचे पाय, कंबर, हात आणि मुखमंडलाचा कायापालट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्‍यामुळे मूर्तीची स्‍थिती जाणून घेण्‍यासाठी केंद्रीय पुरातत्‍व विभागाच्‍या अधिकार्‍यांनी १४ मार्चला मंदिराला भेट दिली. यावेळी महालक्ष्मीच्या मूर्तीची पहाणी केली, तसेच जिल्‍हाधिकार्‍यांशी चर्चा केली.

श्रीपूजक गजानन मुनीश्‍वर यांनी महालक्ष्मी देवीच्‍या मूर्ती संवर्धनाविषयी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांचे वकील गांधी म्हणाले केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाईच्या मूर्तीशी छेडछाड केली आहे. कोणत्याही परवानगी शिवाय चेहऱ्यावर यापूर्वी लावलेला लेपचा काही थर काढून टाकला आहे.

लेपचा काही थर काढून टाकल्यानंतर मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर कृत केल्याचा दावा गांधी यांनी केला. आज (१५ मार्च) या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात (court) होणार असल्याची माहिती वकील गांधींनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jitendra Awhad : भटकत्या आत्म्याची ताकद काय आहे, हे त्यांना आता कळेल; जितेंद्र आव्हाड यांचा मोदींना इशारा

Today's Marathi News Live : न्यायालय अवमान प्रकरण : सुप्रीम कोर्टाकडून बाबा रामदेव यांना मोठा दिलासा

Air Cooler Precautions | कूलरचा शॉक लागू नये म्हणून काय काळजी घ्यायची?

Dhananjay Mahadik Vs Satej Patil: मुश्रीफांवर झालेल्या अन्यायाचा धनंजय महाडिकांनी वाचला पाढा, कागलकरांना वचपा काढण्याचं केलं आवाहन

Breaking: ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत मोठी कारवाई! फॉरच्युनरमधून तब्बल 1.14 कोटींची कॅश जप्त

SCROLL FOR NEXT