चंद्रपूरातील दारूबंदी उठवल्याने तळीरामांकडून पालकमंत्री वडेट्टीवार यांची पूजा  संजय तुमराम
महाराष्ट्र

चंद्रपूरातील दारूबंदी उठवल्याने तळीरामांकडून पालकमंत्री वडेट्टीवार यांची पूजा

बार मालकाने काउंटरच्या बाजूला दर्शनी भागात फोटो लावून केलेल्या आरतीचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दारू 6 वर्षांनी पुन्हा सुरू झाली आहे. याचा असीम आनंद व्यावसायिकांना झाल्याचं एका वायरल व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आलं आहे. दारुबंदी उठविणा-या पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा केली जात असतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. Pooja of Minister Wadettivar for lifting the ban on alcohol in Chandrapur

हे देखील पहा -

चांगलाच बार मालकाने काउंटरच्या बाजूला दर्शनी भागात फोटो लावून केलेल्या आरतीचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. चंद्रपुरात दारुबंदी उठविल्यानंतर मद्यपींच्या आनंदाला उधाण आले आहे. आपला आनंद सेलिब्रेट करण्यासाठी चंद्रपूर शहराच्या वेशीवर असलेल्या ग्रीन पार्क बार रेस्टॉरंटमधे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची ही प्रतिमा लावण्यात आली आहे.

या बार उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी वडेट्टीवार यांच्या प्रतिमेची साग्रसंगीत पूजा केली गेली. जिल्हाभरातील बार-रेस्टॉरंटच्या माध्यमातून दारूबंदी उठल्याचा आनंद तळीराम घेत आहेत.

प्राप्त माहितीनुसार दारूबंदी उठल्यानंतर पहिल्या 3 दिवसात सुमारे 1 कोटींची दारू तळीरामांनी रिचविल्याची प्राथमिक माहिती आहे. गेली 6 वर्षे अत्यंत तोट्याची गेल्याची भावना बारमालकांनी व्यक्त केली. वडेट्टीवार यांनी दारुबंदी उठवून मद्य व्यावसायिक आणि बारमालक व त्यावर आधारित रोजगार यांना चालना दिल्याने हे अनंत उपकार विसरणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदविली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT