Nitesh Rane saam Tv
महाराष्ट्र

Wagh Nakh Politics: वाघनखांवरून राजकारण तापलं; नीतेश राणेंची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका

Nitesh Rane: महाराष्ट्रात आणण्यात येणाऱ्या नखांवरून आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारला प्रश्न केला होता.

Bharat Jadhav

Nitesh Rane Criticism On Aditya Thackeray:

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात येणार आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्याच्या १६ तारखेला महाराजांची वाघनखं मुंबईत आणली जाणार आहेत. यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्याच लंडनला रवाना होणार आहेत. पण त्याआधी राज्यातील नेते आपल्या शाब्दिक नखांनी एकमेकांना ओरबाडत असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात आणण्यात येणाऱ्या नखांवरून आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारला प्रश्न केला होता. त्याला उत्तर देताना भाजप आमदार नीतेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली. (Latest Politics News)

राज्यात आणण्यात येणारी वाघनखं ही छत्रपत्री शिवाजी महाराज यांनीच वापरलेली वाघनखं आहेत का ? प्रश्न ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केला होता. त्यावर उत्तर देताना नीतेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर ही टीका केलीय. राज्याचे सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार स्वत:ब्रिटनला जाऊन वाघनखं आणण्यासंदर्भात करार करण्यात येणार आहे. हा करार व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयासोबत केला जाणार आहे. दरम्यान हे वाघनखं येण्याआधी राजकीय नेते आपल्या टीकेने एकमेकांना ओरबाडत आहेत.

नीतेश राणेंनी आदित्य ठाकरेंसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरे हे अफजल खानाचे वंशज आहेत का? असा प्रश्न नीतेश राणेंनी केला. वाघनखं खरंच शिवरायांची आहेत का? हा प्रश्न करण्याचा नालायकपणा आदित्य ठाकरेंनी केलाय. अफझल खानचे वंशजच इतिहासावर प्रश्न निर्माण करू शकतात, अशी टीका नीतेश राणेंनी केलीय. यावेळी नीतेश राणेंनी मराठा मूक मोर्चावेळी सामना मूखपत्रात करण्यात आलेल्या टीकेचाही समाचार घेतला.

आदित्य ठाकरेंच्या वडिलांनी त्यांच्या सामना मूखपत्रात आमच्या मराठा समाजाच्या आई-बहिणीला हिणवणारं कार्टून काढायला लावलं होतं. तर त्यांचा कामगार संजय राऊत यांनी शिवरायांच्या गादीचे पुरावे मागितले होते. त्यांच्या वंशजाचे पुरावे मागितले होते. यामुळे आदित्य ठाकरे हे खरंच बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत का? याचे पुरावे मागितले तर चालतील का? म्हणून आमच्या शिवरायाचा तू अपमान केलास. ते वाघनखं आमच्या सारख्या मावळ्यांना चांगल्याप्रकारे वापरता येतात ते लक्षात ठेवावं, असा इशाराही त्यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT