Satyajeet Tambe Saam TV
महाराष्ट्र

Nashik Election: सत्यजित तांबेनी बाजी मारली; विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलं...

तब्बल २९ हजार ४६५ मतांनी सत्यजित तांबे विजयी झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी बाजी मारली आहे. मोठ्या मताधिक्याने सत्यजित तांबे यांनी हा विजय मिळवला आहे. तब्बल २९ हजार ४६५ मतांनी सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. (Maharashtra Political News)

विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना सत्यजित तांबे यांनी म्हटलं की, जनतेचे आभार व्यक्त करतो. या निवडणुकीत अनेक संघटना आणि संस्थांनी मला मदत केली. डॉ सुधीर तांबे यांनी तीन टर्म चांगली सेवा केली आहे.

आता अशीच सेवा माझ्याकडून होईल. मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने मताधिक्य कमी झाले. मतदान यादीतील घोळ आणि सोमवारचा दिवस असल्याने मतं अपेक्षेपेक्षा कमी पडली. लवकरच मी राजकीय भूमिक स्पष्ट करेल. 4 फेब्रुवारीला म्हणजे उद्याच मी पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सत्यजित तांबे यांनी सांगितलं आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसमधून बंड करत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीवर लागून होतं.

 सत्यजित तांबे यांनी पाचव्या फेरीअखेर एकूण ६८ हजार ९९९ मतं मिळवली आहे. तर शुभांगी पाटील यांना केवळ ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यांचा तब्बल २९ हजार ४६५ मतांनी पराभव झाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल

Maharashtra Waterfalls : महाराष्ट्रातील 'हे' ५ धबधबे खूप कमी लोकांना माहितेय, एकदा पाहिल्यावर प्रेमातच पडाल

IMD Alert : रखडलेला मॉन्सून 'या' दिवशी पुन्हा ॲक्टिव्ह; 'या' जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा, तर मुंबई-ठाण्याला उष्णतेचा इशारा

Blood Pressure Control : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी किती वेळ चालणं योग्य? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Health Care: रोज भात खाल्ल्याने वजन वाढते का? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT