Sanjay Raut, Eknath Shinde, Devendra Fadnavis Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: ही तर अदानी बचाव यात्रा..., सावरकर गौरव यात्रेवरून संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

Sanjay Raut On Savarkar Gaurav Yatra : मुख्यमंत्र्यांनी सांगावं सावरकर यांचा जन्म कुठं झाला? असा सवाल यावेळी राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना विचारला.

साम टिव्ही ब्युरो

Political News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. त्यांच्या वक्तव्याचा शिंदे-फडणवीस सरकारने निषेध करत राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. अशात या मुद्द्यावरून आता शिंदे-फडणवीस सरकारने 'सावरकर गौरव यात्रा' काढण्याचे जाहीर केले. यावरून खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला आहे. (Savarkar Gaurav Yatra)

सरकारने सावरकर गौरव यात्रेची घोषणा केल्यावर आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी अदानींचे नाव घेत सत्ताधाऱ्यांना डिवचलं आहे. 'सावरकर गौरव यात्रा' आहे की 'अदानी बचाव यात्रा' असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.

नेमक काय म्हणाले संजय राऊत

आज सकाळी मुंबईतून माध्यमांशी संवाद सांधताना संजय राऊत म्हणाले की, " वीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीच संबंध नाही. उलट सावरकरांना संघ परिवाराने कायम वाळीत टाकलं. काल मुख्यमंत्र्यांनी सावरकर गौरव यात्रेची घोषणा केली. त्यावेळी सावरकरांविषयी त्यांना दोन शब्द नीट बोलता आले नाही. लिहून दिलेलं सर्व ते वाचत होते. यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना वाचू का? असं विचारलं. हीच गुलामी आहे. त्यामुळे ही सावरकर गौरव यात्रा नसून अदानी बचाव यात्रा आहे, असं राऊत म्हणाले.

सावरकर गौरव यात्रा काढून शिंदे-फडणवीस सरकार राजकीय ढोंग करत आहेत. सावरकर क्रांतिकारक आणि समाजसुधारक होते. आम्ही सावरकर जगतोय आणि जगलोय. मुख्यमंत्र्यांनी सांगावं सावरकर यांचा जन्म कुठं झाला? असा सवाल यावेळी राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना विचारला.

राज्यात एकीकडे राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करताना दिसतायत; तर दुसरीकडे ठाकरे गटातील नेते देखील यावर अक्षेप घेत आहेत. अशात मविआवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर संजय राऊतांनी म्हटलं आहे की, "तुम्ही दिलेले कागद वाचू नका. काँग्रेससोबत आमचा संवाद सुरू आहे. राहुल गांधी यांच्याशी आज माझं बोलणं होईल. कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यावेळी महाराजांची गौरव यात्रा तुम्ही काढली नाही. राज्यात मविआ सरकार येणारच, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

SCROLL FOR NEXT