Sanjay Raut PC
Sanjay Raut PC SaamTv
महाराष्ट्र

Sanjay Raut News: शिंदे गटाच्या ४ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार? मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संजय राऊतांचा गौप्यस्फोट

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Cabinet Expansion: शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन आता एक वर्षाचा काळ लोटला आहे. अशात अद्यापही या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. शिंदे गटासह भाजपमधील अनेक नेते मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत आहेत. अशात खासदार संजय राऊत यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Political News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ३ दिवस काश्मिर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावरून संजय राऊतांनी मुंख्यमंत्र्यावर तोंडसुख घेतलं आहे. तसेच भविष्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोठा स्फोट होणार असल्याचं राऊत म्हणालेत. यावेळी एकनाथ शिंदे स्वत: शिंदे गटातील ४ मंत्र्यांना बाहेर काढणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"मुख्यमंत्री कुटुंबासोबत गेले असतील. बर्फ पडत आहे बर्फाची मजा काही वेगळीच असते. इथे उन्हाळा असल्यामुळे डोकं शांत करायला ते गेले असतील. भविष्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तानंतर मोठे स्फोट होणार आहेत. त्या संदर्भात अमित शहा यांनी त्यांना काही आदेश दिले आहेत. या आदेशात शिंदेंना त्यांच्या गटातील चार नेत्यांना वगळण्यास सांगितलं असल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत.

राऊतांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळातून एकच खळबळ उडाली आहे. तसेत शिंदे गटातील ते चार ४ मंत्री नेमके कोण असणार यावर चर्चा होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashatra Election: निवडणूक तोंडावर,ठाकरेंचा शिलेदार तडीपार; सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस

Maharashtra Election: महायुतीत दादाविरुद्ध दादा संघर्ष कायम; चंद्रकांत पाटलांकडून पवारांना संपवण्याची भाषा

Maharashtra Politics 2024 : कोल्हापूरच्या विजयासाठी लाखांच्या पैजा; वाढलेल्या टक्क्यानं वाढवली उत्सुकता

PBKS vs RCB: 'विराट' वादळानं RCB चा विजयी चौकार; पंजाब प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; या संघांचं टेन्शन वाढलं

Tourist Plan: वा भारीच! फक्त 10,000 रुपयांमध्ये जा हनिमूनला

SCROLL FOR NEXT