Navneet Rana  saam Tv
महाराष्ट्र

Navneet Rana : नवरा-बायकोमध्ये बाहेरच्यांनी न बोललेलं बरं; रवी राणांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेवर नवनीत राणांची प्रतिक्रिया

Navneet Rana News : रवी राणा देखील त्यांच्या मर्जीनुसारनिर्णय घेतील. त्यामुळे नवरा बायकोमध्ये बाहेरच्यांनी न बोललेलं बरं, असा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे.

Ruchika Jadhav

अमर घटारे

Political News :

रवी राणा त्यांच्या मर्जीनुसार त्यांचा निर्णय घेतील. नवरा-बायकोमध्ये कोणीही काही बोलू नये, अशा शब्दांत अमरावती लोकसभा महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी स्पष्ट शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्याप्रमाणे आता रवी राणा देखील भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बच्चू कडू यांनी देखील याबाबत भाष्य केलं होतं. त्यावर नवनीत राणांनी थेट स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या नवनीत राणा?

मी रवी राणा यांची बायको म्हणून सांगतो मी भाजपमध्ये आहे. माझे नेते नरेंद्र मोदी, अमीत शहा व देवेंद्र फडणवीस आहेत. मी माझा निर्णय स्वतः घेतलाय. रवी राणा देखील त्यांच्या मर्जीनुसारनिर्णय घेतील. त्यामुळे नवरा बायकोमध्ये बाहेरच्यांनी न बोललेलं बरं, असा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते बावनकुळे?

एक दिवस नवनीत राणा स्वत:च रवी राणा यांना भाजपमध्ये आणतील. आज जरी ते आपल्या पक्षात नसले तरी उद्या असतील. नवनीत राणा स्वत: रवी राणा यांना याबाबत आदेश देतील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता.

काय म्हणाले होते बच्चू कडू

आमदार रवी राणा यांच्या पत्नी भाजपात आहेत, पती स्वाभिमानीमध्ये मग मुलाला प्रहारमध्ये पाठवा, असा खोचक टोला बच्चू कडूंनी रवी राणांना लगावला होता. बच्चू कडू म्हणजे काँग्रेसची बी टिम, अशी टीका रवी राणा यांनी बच्चू कडूंवर केली होती. त्याला बच्चू कडूंनी दिलेल्या प्रत्युत्तरावर आता नवनीत राणा यांनी पुन्हा निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मोटेगावकर याच्या RCC क्लासेस बाहेर निदर्शनं

Team India: वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराला टीममधून डच्चू; टी-२० संघाला मिळाला नवा कर्णधार

Jio Recharge: खुशखबर! Jio च्या या प्लॅनमध्ये मिळेल 20GB डेटा मोफत अन् इतक्या दिवसांची वैधता

Potato Chips Recipe: चहासोबत खा स्वादिष्ट घरगुती स्नॅक; 10 मिनिटांत घरी बनवा टेस्टी रवा बटाट्याचे चिप्स, वाचा रेसिपी

Bribe Case : मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नोंदणीसाठी घेतली लाच; महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT