सुरज सावंत
राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवाला धोका आहे. तसेच त्यांच्यानावे असलेल्या स्टेडिअमवर घापघात करण्याची धमकी देण्यात आलीये. पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेल आला आहे. धमकी देणाऱ्याने सरकारकडे ५०० कोटी आणि गुंड लॉरेन्स बिष्णोईची मागणी केलीये. तसे न केल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्यानावे असलेल्या स्टेडिअमवर घातपात करण्याची दिली धमकी देण्यात आलीये.
भारतात सगळंकाही विकलं जातं, त्यात आम्हीही काही तरी विकत घेतलंय. कितीही सुरक्षा वाढवा, आमच्यापासून तुम्ही वाचू शकत नाही, असं मेलमध्ये म्हटलं आहे. चर्चा पुढे सुरू ठेवायची असल्यास याच मेलवर उत्तर करण्याचे आवाहन या मेलमध्ये केले आहे.
गुरूवारी सकाळी १० च्या सुमारास मुंबई पोलिसांच्या शासकिय मेल आयडीवर धमकीचा मेल आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. सदर घटना गंभीर असून सायबर पोलिसांच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसह काही नेत्यांना आणि मंत्र्यांना देखील याआधी धमकीचे मेल आणि फोन आले आहेत. अशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी देणाऱ्यांचा शोध घेण्याचं आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.