Charanraj Chavare Saam TV
महाराष्ट्र

Political News : शिवसेना शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर, पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुखांना हटवण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी

Shivsena Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उपनेते भरत गोगावले यांच्याकडे चरणराज चवरे यांना हटवण्याची मागणी केली आहे.

भरत नागणे

Pandharpur News :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख चरणराज चवरे यांची हकालपट्टीची मागणी जोर धरु लागली आहे. शिवसेना शिंदे गटाच्याच पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली आहे.

पंढरपूर विभागातील तालुका अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उपनेते भरत गोगावले यांच्याकडे चरणराज चवरे यांना हटवण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

पंढरपूर विभागाच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून मागील काही दिवसांपासून दोन गटात वाद सुरू आहे. त्यातून चवरे यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. जिल्हाप्रमुख चरणराज चवरे हे पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता काम करतात, असा आरोप त्यांच्यावर आहे. (Political News)

पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ येथील तालुका प्रमुखांनी चरण चवरे यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. त्यांमुळे या अंगर्गत वादाचा फटका शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धड भाषणही देता येत नाही, कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर खासदार; काँग्रेसचा नाव न घेता पार्थ पवारांवर सणसणीत पलटवार

Maharashtra News Live Update: लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टरबूज आणि भाजीपाल्याच्या दरात घसरण

Constipation Relief: सकाळी पोट साफ होत नाही? झोपण्यापूर्वी हा १ पदार्थ खा, समस्या दूर होईल

Sambhajinagar : बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Nagpur: बेपत्ता नवरा लवकरच घरी येईल, पूजा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा विवाहितेवर बलात्कार; नागपूर हादरले

SCROLL FOR NEXT