Sanjay Shirsat Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Shirsat : ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात; संजय शिरसाट यांचा मोठा दावा

Political News : ठाकरे गटाचे माझे कुटुंब माझी जबाबदारी सोडून सगळे आमदार आमच्या संपर्कात आहेत. आम्हाला भाजप दाबतेय का? आमचा बळी घेणार का? या सगळ्या चर्चा दुर्दैवी आहेत, असं माध्यमांशी संवाद साधताना शिरसाट म्हणाले.

Ruchika Jadhav

रामू ढाकणे

Sanjay Shirsat News :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विचार करून निर्णय घेत आहेत. आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवबंधान बांधतो, तिकडच्यांसारखे गंडा, दोरे बांधत नाही. ठाकरे गटाचे 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' सोडून सगळे आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू असताना काही जागांसाठी भाजपकडून शिंदेंवर दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. या चर्चेवर बच्चू कडूंनी देखील आज भाष्य केलं. यावर बोलताना तसे काही नसून ठाकरे गटाचे सगळे आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.

मुख्यमंत्री शिंदे सर्वसामान्य कुटुंबातून आहेत. अनेक संकटांना त्यांनी तोंड दिले आहे. काही लोक जे काही बोलतात त्यात शिंदेंनी समंजस भूमिका घेतलीये. आम्हाला भाजप दाबतेय का? आमचा बळी घेणार का? या सगळ्या चर्चा दुर्दैवी आहेत, असं माध्यमांशी संवाद साधताना शिरसाट म्हणाले.

बच्चू कडूंनी काही भावना व्यक्त केल्या असाव्यात. मात्र, असे काही घडणार नाही. त्यांच्या वक्तव्याला महत्व निश्चित आहे. मात्र ती त्यांची भावना असेल. उद्या दुसऱ्या टप्प्याची अखेरची अर्ज करण्याची तारीख आहे. राहिलेल्या नावांची घोषणा आज करण्यात येईल, असंही यावेळी शिरसाटांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : अडथळे दूर होणार, ३ राशींची होणार चांदीच चांदी; वाचा उद्याचे राशीभविष्य

Jr NTR: अभिनेत्यावर झाली शस्त्रक्रिया, शुटिंगवेळी झाली होती दुखापत; पुढील ३ महिने घ्यावी लागणार सक्तीची विश्रांती

Maharashtra News Live Update : ताडोबाच्या जंगलात वाघ दिसताच पर्यटकांची हुल्लडबाजी

Minister List: रायगडात गोगावले करणार ध्वजारोहण; नाशिकमध्ये कोण?; स्वातंत्र्यदिनी तुमच्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते होणार ध्वजारोहण, वाचा संपूर्ण यादी

रिक्षाजवळ दुचाकी आणली, महिलेच्या हातावर मारून पर्स हिसकावली नंतर... मुंबई पोलिसांनी उलगडलं रहस्य

SCROLL FOR NEXT