bjp  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : भाजपमधील मेगाभरती अंगलट येणार? भाजपमधील इनकमिंगने मित्रपक्ष धास्तावले, वाचा स्पेशल रिपोर्ट

mahayuti news : भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. मात्र, या इनकमिंगने मित्रपक्ष धास्तावल्याची चर्चा आहे.

Saam Tv

राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी पक्षप्रवेशाचा झपाटाच लावलाय.. भाजपने शिंदे सेना आणि अजित पवारांचे आमदारांचे पारंपरिक विरोधक पक्षात घेत मित्रपक्षांचीच कोंडी केलीय. त्यातच काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शिंदे सेनेने शेलक्या शब्दात गोरंट्याल यांच्यावर निशाणा साधलाय.

विधानसभा निवडणुकीत 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपने 2029 ची तयारी सुरु केलीय.. त्यासाठी भाजपने शिंदे सेना आणि अजित पवारांचे आमदार असलेल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु केलीय...

भोर-मुळशी-वेल्हा

राष्ट्रवादीचे शंकर मांडेकरांचे विरोधक संग्राम थोपटेंचा भाजपमध्ये प्रवेश

पाटण

शंभुराज देसाईंचे विरोधक सत्यजित सिंह पाटणकर भाजपात

इंदापूर

दत्ता भरणेंचे विरोधक उद्योजक प्रवीण मानेंच्या हाती कमळ

नाशिक

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे भाजपात

रायगड

शिंदे सेनेचे विरोधक पंडित पाटील यांचा भाजपात प्रवेश

पुरंदर

शिंदे सेनेचे आमदार विजय शिवतरेंचे पारंपरिक विरोधक संजय जगताप भाजपात

भाजपमध्ये होत असलेल्या या पक्षप्रवेशाला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सत्तेची हाव असल्याचं म्हटलंय...

भाजपचे नेते शतप्रतिशत भाजप हा नारा देतोय.. त्यामुळेच भाजपमध्ये पक्षप्रवेशाच्या रांगा लागल्या आहेत... मात्र ही मेगाभरती महाविकास आघाडीला धक्का देणारी आहे की भाजप आणि महायुतीच्या नेत्यांच्या वर्चस्वाला धक्का देणारी? याचीच चर्चा रंगलीय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपुरात ओबीसी विद्यार्थी फेलोशिपच्या मुद्द्यावरून आक्रमक

डिझेल टँकर पेटला; आगीच्या ज्वाळा अन् धुराचे काळेकुट्ट लोट रस्त्यावर पसरत गेले...VIDEO

Bhumi Pednekar Photos: 'दम लगा के हैशा' फेम भूमीचा जलवा, काळ्या ड्रेसमधील फोटो झाले व्हायरल

Gossip: गॉसिप करणं फायद्याचं की तोट्याचं? रीसर्चमधील निष्कर्ष एकदा वाचाच!

Saturday Horoscope : हॉस्पिटलायझेशनवर खर्च होईल, तब्येतीची काळजी घ्या; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

SCROLL FOR NEXT