Policeman suffered heart attack while riding bike SAAM TV
महाराष्ट्र

Video: धावत्या दुचाकीवरच पोलिसाला हार्ट अटॅक आला, खाली कोसळला; गर्दीतल्या देवदूताने असे वाचवले प्राण

Policeman Heart Attack Video : अचानक घडलेल्या या घटनेमुळे लोकांनी तेथे मोठया प्रमाणात गर्दी केली.

Chandrakant Jagtap

>> अजय सोनवणे, साम टीव्ही

Policeman suffered heart attack while riding bike : देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय मनमाड शहरातील नागरिकांना आला. नागेश दांडे नावाचे रेल्वे पोलीस कर्मचारी दुचाकीवरून ड्युटीवर जात असताना शहरातील मुख्य बाजार पेठेत अचानक त्यांच्या छातीत वेदना सुरू झाल्या. काही कळायच्या आत ते दुचाकीवरून खाली पडले.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे लोकांनी तेथे मोठया प्रमाणात गर्दी केली. ही गर्दी पासून भागवत झाल्टे नावाचा तरुण तिथे आला. त्याने थांबून चौकशी केली तेव्हा पोलीस कर्मचारी गाडीवरून अचानक पडल्याचं त्याला समजलं. भागवतने त्या कर्मचाऱ्याची परिस्थीती पाहिली आणि त्याला हार्ट अटॅक आल्याचे त्याच्या लक्षात आले.

यानंतर क्षणाचाही विलंब न करता भागवतने दोन्ही हाताने त्याच्या छतीवर पंपींग करण्यास सुरुवात केली. दोन तीन वेळा त्याने दोन्ही हातांनी छातीवर दाब दिला. त्यानंतर त्याने तोंडाच्या साह्याने कर्मचाऱ्याला श्वास दिला. भागवत तात्काळ केलेल्या प्रथोमोपचारामुले पोलीस कर्मचारी नागेश शुद्धीवर आले. (Latest Political News)

यानंतर तेथील लोकांनी त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता नागेशला हृदय विकाराचा जोरदार धक्का बसला होता मात्र झाल्टे ने दाखविलेल्या समय सूचकतेमुळे त्याचे प्राण वाचले एका प्रकारे नागेशसाठी भागवत झाल्टे हा देवदूत ठरला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT