Chhatrapati Sambhaji Nagar Crime News saam tv
महाराष्ट्र

Crime News : तो म्हणे ‘करो प्यार’, तिचा होता नकार ! सहा महिने तिच्यावर झाला अत्याचार, अखेर...

नाराज झालेल्या युवतीने पाेलिसांत धाव घेतली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर (chhatrapati sambhaji nagar) शहरातील एका नामांकित रुग्णालयात (hospital) साफसफाईचे काम करणाऱ्या युवकाने लग्नाचे (marriage) आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गारखेडा (garkheda) परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीनंतर युवकावर गुन्हा दाखल केल्याची माहिती तपासी अधिकारी संदीप काळे यांनी दिली.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी व संशयित आरोपी हे दाेघे गारखेड्यातील एका रुग्णालयात साफसफाईचे काम करतात. तेथेच त्यांची ओळख झाली. त्यातून मैत्री झाली. त्याचे रुपांतर प्रेमात झाले.

त्यानंतर युवकाने लग्न करण्याचे वारंवार आमिष दाखवत युवतीवर शारीरिक संबंध ठेवले. याबराेबरच पैशाची गरज आहे असे सांगून युवकाने युवतीकडून वेळोवेळी डिजीटलच्या माध्यमातून 95 हजार रुपये घेतले. (Maharashtra News)

युवकाने तिला लग्न करू असे सांगून नंतर लग्न करण्यास टाळाटाळ केली. सुमारे सहा महिन्यांपासून लग्नाचे आमीष दाखवून त्याने बळजबरीने वारंवार शारीरिक संबंध करून माझी फसवणूक केल्याची तक्रार युवतीने पाेलिसांत केली. या प्रकरणी पाेलिसांनी युवकावर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT