Latur , crime news, Nilanga saam tv
महाराष्ट्र

Latur : 'खल्लास केल्याशिवाय वडिलांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही' जिवे मारण्याची धमकी देत युवकावर हल्ला

येळनूर गावातील मारुती मंदिर जवळ झाली मारामारी.

दीपक क्षीरसागर

Latur Crime News : एखाद्याला खल्लास केल्याशिवाय माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती वाटणार नाही असे म्हणत एका युवकानं दुस-या युवकास (youth) मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध येळनूर पोलिसांनी (police) गुन्हा दाखल केला आहे. (Breaking Marathi News)

ही घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील येळनुर येथे घडली. या मारहाण प्रकरणी विक्रम करण सोळुंके याने पाेलीस ठाण्यात तक्रार दिली. आकाश अनिल साळुंके यांच्या वडिलांच्या खून प्रकरणात त्याला अटक झाली होती. विक्रम हा जामिनावर सुटून गावी आलेला होता.

कृषी विभागाचे कर्मचारी गावामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादी घेऊन आले होते. त्यांनी आधार कार्ड घेऊन येण्यास सांगितल्यामुळे फिर्यादी विक्रम हा घरी जाऊन आधार कार्ड घेऊन गावातील मारुती मंदिर जवळ आला. (Latur Latest Marathi News)

तिथे आकाश अनिल साळुंखे आणि त्याचे काही मित्रही होते. विक्रमला पाहताच आकाश संतापला व त्याने शिवीगाळ करत त्याला लाथा बुक्क्याने काठीने मारहाण केली. तसेच एखाद्याला खल्लास केल्याशिवाय माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती वाटणार नाही असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

Ambernath : अंबरनाथमध्ये तरुणावर हल्ला, पुतणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून काकाने काढला राग; ५ आरोपींवर गुन्हा

Ketan Agarwal Case: केतन अग्रवालच्या हत्येआधीचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, सिया अन् चेतन होते सोबत

संजय दिना पाटील यांची पत्रकारांना शिवीगाळ; मुख्यमंत्री काय म्हणाले? VIDEO

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT