पिंपरी-चिंचवडमध्ये हुक्का पार्टीवर पोलिसांची धाड Saam Tv
महाराष्ट्र

हर्बलच्या नावाखाली तंबाखूजन्य फ्लेवर युक्त हुक्का, पिंपरी-चिंचवडमध्ये हुक्का पार्टीवर पोलिसांची धाड

नवीन वर्षाच्या स्वागता दरम्यानच पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित हुक्का पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : नवीन वर्षाच्या स्वागता दरम्यानच पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित हुक्का पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली आहे. पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी मध्यरात्री आयोजित करण्यात आलेल्या या हुक्का पार्टीवर धाड टाकत कारवाई केलीये. 

हिंजवडी परिसरात सुरु असलेल्या एचटूओ स्पोर्ट रुफ टॉप बारच्या न्यू इयर पार्टीवर कृष्णप्रकाश यांनी धाड टाकली आहे. या बारमध्ये हर्बल हुक्याच्या नावाखाली ग्राहकांना तंबाखूजन्य फ्लेवर युक्त हुक्का दिला जातो, अशी खात्रीशीर गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली होती.

हेही वाचा -

त्या माहितीच्या आधारावर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांसह एचटूओ या रुफ टॉप बारवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात फ्लेवर्ड टोबॅको आणि हुक्का पॉट साहित्य जप्त केले आहेत. त्याच बरोबर एचटूओ या बारमध्ये हुक्का पार्लर चालवणाऱ्या चालक-मालकावरही सामाजिक सुरक्षा पथकाने गुन्हा दाखल केला आहे. 

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT