नागपूरमध्ये सडक्या सुपारीच्या काळ्या व्यवसायावर पोलिसांचा छापा!  SaamTVNews
महाराष्ट्र

नागपूरमध्ये सडक्या सुपारीच्या काळ्या व्यवसायावर पोलिसांचा छापा!

छापेमारीत १ कोटींचा मुद्देमाल जप्त; या छापेमारीत सुगंधी तंबाखू, सडक्या सुपारीचा समावेश आहे.

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूर मध्ये सडक्या सुपारीच्या अवैध धंद्यांची व यामध्ये गुंतलेल्या व्यापाऱ्यांची पाळेमुळे शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचा धडाका नागपूर पोलिसांनी लावला असून गुप्त माहितीच्या आधारे पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आलेल्या छापेमारीत 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

हे देखील पहा :

नागपूर मध्ये विदेशातून सडकी सुपारी आयात करून मध्य भारतात त्याचा पुरवठा केला जातो. यामध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. मात्र, सडक्या सुपारीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होत असून नागपूर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. सडक्या सुपारीविरोधात ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या पथकाने मौदा पोलीस स्टेशन च्या हद्दीत छापा मार कारवाई करत 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या छापेमारीत सुगंधी तंबाखू, सडक्या सुपारीचा समावेश आहे. यात एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याने पोलिसांना एका गोडाऊनचा पत्ता मौदा तालुक्यात असल्याचे सांगितले. त्यावरून ही कारवाई केली आहे. या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध सुगंधी तंबाखू असून त्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध सुपारी व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT