संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण, व्हिडीओ समोर Google
महाराष्ट्र

Santosh deshmukh Case : हत्येचा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल; सरपंच हत्येतील मोकारपंथी कोण? पाहा स्पेशल रिपोर्ट

Santosh deshmukh Case update : सरपंच देशमुखांच्या हत्येचे 66 पुरावे समोर आले आहेत. मात्र पोलिसांनं समोर आणलेल्या पुराव्यांमधील एका ओळीमुळे कराड सुटणार की काय अशी शंका व्यक्त होतेय. आरोपींना हत्या करताना क्रूरतेचा कळस कसा गाठला? आणि पोलिसांनी नेमकी काय पळवाट शोधलीय ? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.........

Vinod Patil

सरपंच हत्येप्रकरणाला जसजसे दिवस लोटू लागलेत. तसतसे य़ा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे होऊ लागलेत. आता सरपंच संतोष देशमुख यांना हालहाल करुन मारतांनाचे 15 फोटो आणि 3 व्हिडीओ व्हायरल केल्याचा मोठा खुलासा पोलिस तपासात समोर आल्याचं सुत्रांनी सांगितलंय. यामुळे मारेकऱ्यांचा निर्दयीपणा देखिल उघड झालाय. संतोष देखमुखांना मारतांना त्यांचे हालहाल करतांनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करण्यात आले असून ते मिळवण्यात पोलिसांना यश आलंय. हे फोटो आणि व्हिडीओ आरोपींच्या विरोधातील एक मोठा पुरावा आहेत. या 15 फोटोमध्ये आणि 3 व्हिडीओत नेमकं काय आहे पाहुया..

सरपंचाची हत्या कॅमेऱ्यात कैद

आरोपी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरील शर्ट ओरबाडत जोरजोरात हसू लागला

मारहाणीनंतर जयराम चाटेनं सरपंचांना निर्वस्त्र केलं

देशमुखांना निर्वस्त्र करतांना आरोपी केदार हसत सेल्फी काढत होता

अर्धमेल्या अवस्थेतील देशमुखांच्या अंगावर आरोपी प्रतिक घुलेने लघुशंका केली

आरोपी घुले हैवानी आवेशात देशमुखांशेजारी उभा राहुन फोटो काढतो

देशमुखांना शिव्या देत आरोपीने लाथाबुक्क्या आणि पाईपने मारहाण केली

मारहाणीमुळे देशमुखांच्या शरीरातील रक्त तळपायापर्यंत ओघळल्याचं समोर

अमानुष मारहाण करुन वाल्मिक कराडच्या गँगनं याच हैवानी कृत्याचे फोटो आणि व्हिडीओ मोकारपंथी या ग्रुपवर शेअर केले आणि त्याच व्हॉट्सअप ग्रुपमधील इतर टवाळखोरांनी त्याचा यादुष्टांच्या या कृष्णकृत्याचा आनंद लुटल्याचं सुत्रांनी सांगितलंय. कराड आणि त्यांच्या गँगनं इतकं राक्षसी कृत्य करुन देखिल वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अंजली दमानियांनी केलाय. पोलिसांनी तयार केलेल्या चार्जशीटमध्ये कराडसाठी पळवाटा असल्याचं म्हणत त्यांनी संपुर्ण चार्जशीटवर प्रश्न उपस्थित केलेत.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहुया.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

Dahi handi : एक गाव-एक दहीहंडी! पण फोडण्याची हटके पद्धत, इथे विहिरीत उडी मारून फोडली जाते दहीहंडी; Video

Maharashtra Live News Update: इंदापूरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, 17 हुन अधिक नागरिकांचा घेतला चावा

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; पुण्यात घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत शोककळा

Home Loan : होम लोन घेणाऱ्यांना जोरदार झटका! देशातील सर्वात मोठ्या बँकेनं वाढवले गृहकर्ज व्याजदर, EMI वाढणार

SCROLL FOR NEXT