Police Saam Tv
महाराष्ट्र

अकोल्यात पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या! सुसाईड नोटमध्ये लिहिले कारण...

अकोल्यातील पोलीस मुख्यालयात पोलीस कर्मचारी म्हणून संजय सोळंके हे कार्यरत आहेत. त्यांनी आज पोलीस वसाहत परिसरात झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले आहे.

अॅड. जयेश गावंडे

जयेश गावंडे

अकोला: वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. संजय सोळंके असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून या कर्मचाऱ्याने आत्महत्येपूर्वी चिट्ठी लिहून आत्महत्या कारामागचे कारण लिहून ठेवलं आहे. त्या चिट्ठीत, ठाणेदार आणि पोलीस दलातील बाबू जबाबदार असल्याचा आरोप केलाय.

अकोल्यातील पोलीस मुख्यालयात पोलीस कर्मचारी म्हणून संजय सोळंके हे कार्यरत आहेत. त्यांनी आज पोलीस वसाहत परिसरात झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले आहे. दरम्यान खदान पोलिस कर्मचाऱ्यांना निंबाच्या झाडाला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

हे देखील पाहा-

सूत्रांच्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी मृतक संजय सोळंकेंनी एक सुसाईड नोट लिहिली आहे. ज्यामध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याच नमूद आहे. ठाणेदार आणि पोलीस दलातील बाबू यांच्याकडून वेळो-वेळी धमकी देने या कारणास्तव मी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तरीही या संदर्भात अधिक माहिती कळू शकली नसून पुढील तपास खदान पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार विजय नाफडे हे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT