गडचिरोलीत पोलीस- नक्षलवाद्यांत चकमक, पाचपेक्षा जास्त नक्षलवादी ठार  Saam Tv
महाराष्ट्र

गडचिरोलीत पोलीस- नक्षलवाद्यांत चकमक, पाचपेक्षा जास्त नक्षलवादी ठार

जिल्ह्यात उत्तर- पूर्व भागात छत्तीसगड सीमेजवळच्या परिसरात शनिवारी सकाळपासूनच पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चकमक सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गडचिरोली : जिल्ह्यात उत्तर- पूर्व भागात छत्तीसगड सीमेजवळच्या परिसरात शनिवारी सकाळपासूनच पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चकमक सुरू आहे. यामध्ये ५ पेक्षा जास्त नक्षलवादी ठार झाले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दुपारपर्यंत ही चकमक मोठ्या प्रमाणात सुरूच होती. काही मृत नक्षलींचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत.

हे देखील पहा-

या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचे ठिकाण उद्ध्वस्त करण्यात आले आहे. पोलिसांचे ऑपरेशन अजून संपले नसल्यामुळे त्याविषयी अधिक माहिती सांगता येणार नसल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी बोलताना सांगितले आहे. कोरची तालुक्यामधील ग्यारापत्ती, कोटगुल परिसरात जंगलात नक्षल्यांचे शिबिर लागले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र करत त्या भागाकडे मोर्चा वळविला आहे. पोलिसांच्या पथकाची चाहुल लागताच नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला आहे. त्याला प्रत्युत्तर देत पोलिसांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. या चकमकीत पोलिसांच्या गोळीने काही नक्षलवाद्यांचा वेध घेतला आहे.

Edited By- digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT