अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki chitale) सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केतकीचा तीव्र निषेध व्यक्त केला होता. मनेस अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही पत्रक काढून जाहीर निषेध केला. बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी केतकीवर कळवा आणि पुणे पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेने शनिवारी केतकीला अटक केली असून १८ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलीय. मात्र, केतकीच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. अकोल्याच्या खदान पोलीस स्टेशनमध्येही (khadan police station) केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे केतकीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, केतकी चितळेने सोशल मीडियावरून खासदार शरद पवार यांच्याविरूद्ध अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.या पोस्टमध्ये संत तुकाराम महाराजांच्या अंभगाचीही विटंबना करून महाराजांचा सुद्धा केतकीने अपमान केला आहे. केतकीची पोस्ट अत्यंत आक्षेपार्ह असून तिच्यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून तत्काळ अटक करण्यात यावी.तसेच तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात यावा,अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पना गवारगुरू केली होती.
सायबर पोलीस आणि खदान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी,अशी मागणीही त्यांनी केली. या निवेदनाच्या प्रती त्यांनी गृहमंत्री, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांनाही पाठवल्या आहेत.दरम्यान, अभिनेत्री केतकी चितळेवर अकोला खदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 153 अ, 500, 501,505 (2 ) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून खदान पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस पुढील कारवाई करीत आहेत.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.