Police Saam Tv
महाराष्ट्र

Satara News : साताऱ्यातील पाटण तालुक्यात गोळीबार, घटनेत २ ठार; परिसरात खळबळ

साताऱ्यातील पाटण तालुक्यातील मोरणा भागात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

संभाजी थोरात

सातारा : साताऱ्यातून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील मोरणा भागात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन जण ठार तर एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील (Satara) पाटण तालुक्यात गोळीबाराची मोठी घटना घडली आहे. पाटण तालुक्यातील मोरणा भागात ही गोळीबार झाल्याची मोठी घटना घडली आहे. या गोळीबारात दोन जण ठार आणि एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेतील जखमी व्यक्तीवर कराड येथे उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत.

एक संशियत ताब्यात

पाटण तालुक्यातील मोरणा भागात गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पाटण पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात संशयित मदन कदम यांना ताब्यात घेतला आहे. संशयित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निकटवर्तीय असल्याचे म्हटले जात आहे. मदन कदम यांचा मुख्यमंत्र्यांसोबतचा एक फोटोही समोर आला आहे.

रविवारी रात्री झालेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबार नेमका कोणी केला, कशासाठी केला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी मुख्यमंत्र्यांच्या चालकाला शिवीगाळ अन् मारहाण; पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा

Maharashtra News Live Update: अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई

Latest Alta Design For Feet: पायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी ट्राय करा अल्ताचे हे ७ लेटेस्ट डिझाइन्स

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तिहेरी अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

Mumabi Tourism : गर्दी नाही, गोंधळ नाही; 'येथे' लपलाय अथांग समुद्रकिनारा, जणू मुंबईतला स्वर्गच

SCROLL FOR NEXT