Ausa Police Station Saam Tv
महाराष्ट्र

लातुरात पोलीस हवालदारला तीन हजारांची लाच स्वीकारताना अटक

पुढील तपास अन्वर मुजावर करीत आहेत.

दीपक क्षीरसागर

लातूर - जिल्ह्यातील औसा येथील पोलीस (Police) स्टेशनमधील पोलीस हवालदार यांनी एका प्रकरणात मदत करण्यासाठी पाच हजारांची लाच (Bribe) मागितली. त्यातील तीन हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, औसा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राजेंद्र गोरख लामतुरे यांनी एका प्रकरणात तक्रारदार यांना मदत करतो म्हणून पाच हजारांची मागणी केली. त्यातील तीन हजार रुपये स्वीकारताना लामतुरे यांना अटक करण्यात आली आहे.

हे देखील पाहा

औसा पोलिसात भादवि 294, 323, 506 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस हवालदार लामतुरे यांनी तक्रारदारास पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती पहिला हप्ता 3 हजार व दुसरा हप्ता 2 हजार अशी लाच मागितली. शुक्रवारी पाच वाजण्याच्या सुमारास लामतुरे यांनी तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारली. ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने ही कारवाई केली आहे. पुढील तपास अन्वर मुजावर करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

Relationship Advice : जोडीदाराशी बोलताना ‘या’ ८ गोष्टी टाळा; नाही तर तुटू शकतं नातं

SCROLL FOR NEXT