Police case filed against bjp mla Akash Fundkar saam tv
महाराष्ट्र

राजकीय वर्तुळात खळबळ! भाजप आमदार आकाश फुंडकर यांच्यासह २८ कार्यकर्त्यांवर गुन्हा

राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे.

संजय जाधव

बुलडाणा : राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. पोळा सणाच्या दिवशी (Pola Festival) दोन गटांत दगडफेक झाल्याच्या घटनेनंतर खामगावचे भाजप आमदार आकाश फुंडकर यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी फुंडकर यांनी खामगाव शहरात बंद पाळण्याचे आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देऊन कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून पोलिसांचा निषेध केला होता. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी आमदार आकाश फुंडकर (Akash Fundkar) यांच्यासह २८ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. (BJP mla Akash Fundkar latest news update )

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव शहरातील बोरिपूरा परिसरात दोन गटात पोळा सणाच्या दिवळी दगडफेक झाली होती. या हाणामारीच्या घटनेवेळी खामागावचे भाजप आमदार आकाश फुंडकर उपस्थित होते. पोळा सणाच्या दिवशी बोरिपूरामध्ये दोन गटात दगडफेक झाली होती. या घटनेनंतर फुंडकर यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पोलिसांचा निषेध करण्यासाठी आमदार फुंडकर यांनी खामगाव शहरात बंद पाळण्याचे आवाहन केले होते.

त्यानंतर खामगाव शहरात बंद पाळण्यात आला होता. याच दरम्यान फुंडकर यांच्या नेतृत्वात बाईक रॅली काढण्यात आली होती. ही रॅली पोलीस स्टेशन समोर थांबवून पोलिसांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी धडक कारवाई करत आमदार आकाश फुंडकर यांच्यासह २८ कार्यकर्त्यांवर खामगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT