Osmanabad Police Fight Saam TV
महाराष्ट्र

पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसच आपसात भिडले; वादाचं रुपांतर मारहाणीत

Osmanabad Crime News : या प्रकरणी आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

साम टिव्ही ब्युरो

कैलास चौधरी

उस्मानाबाद : पोलीस अधीक्षक कार्यालयातच (Police Superintendent office) दोन पोलीस कर्माचाऱ्यांमध्ये (Police Fighting) हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कार्यालयीन अधीक्षकांनेच लिपिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सदरील प्रकार उस्मानाबाद (Osmanabad Crime News) जिल्ह्यातून समोर आला आहे. कार्यालयीन अधीक्षक नरसिंग कासेवाड यांनी कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपिक मच्छिंद्र कृष्णा जाधव यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Police Beaten Up Colleague At Office Of The Superintendent Of Police In Osmanabad)

अंतर्गत शिस्तीसाठी पोलीस दल प्रख्यात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत बेशिस्तपणा वाढल्याचे दिसत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात असाच प्रकार बुधवारी घडला. केवळ निनावी अर्ज मागितल्याच्या कारणावरून पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षकाने लिपिकाला लाथा, बुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकीही दिली. कार्यालयीन अधीक्षक नरसिंग लक्ष्मण कासेवाड यांनी वरिष्ठ श्रेणी लिपिक मच्छिंद्र कृष्णा जाधव यांना आपल्या कक्षात बोलावून घेतले.

एलसीबीत बदली झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात आलेल्या तक्रारीबाबत जबाब देण्यास सांगितले. जाधव यांनी त्यांना निनावी अर्जाची व पत्राची मागणी केली. तेव्हा कासेवाड यांनी भडकून जाधव यांना शिविगाळ व अश्लिल भाषेत बोलण्यास सुरुवात केली. आयजी साहेबांना तुझ्या विरोधात भडकावून तुझी वाट लावतो, तुला जिवंत सोडणार नाही, अशीही धमकी देत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. घडलेला सर्व प्रकार जाधव यांनी हा प्रकार अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागिय पोलीस अधिकाऱ्यांनाही सांगितला. त्यानंतर त्यांनी आनंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : राज्यसभेत अमित शहांना बोलवा - मल्लिकार्जुन खर्गे

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंविरोधात संजय राऊतांच्या हॉटेलमध्ये बैठका; खासदाराच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Auto Taxi Marathi Rule : मराठी आलं नाही तर लायसन होणार रद्द! आज येणार शासनाचा मोठा निर्णय; परिवहन मंत्र्यांची माहिती

Society Rule : सोसायटीत जिम अन् स्विमिंग पूलचे वेगळे पैसे घेतले जातायत? मग ही बातमी नक्की वाचा, तुमचे हक्क काय सांगतात

SCROLL FOR NEXT