chandrapur, police, state bank of india Saam Tv
महाराष्ट्र

State Bank Of India : स्टेट बँक ऑफ इंडिया 'या' शाखेतील दराेड्या प्रकरणी दाेघांना अटक

बॅंक लुटणारी मोठी टोळी असल्याने आणखी काही आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

संजय तुमराम

Chandrapur : चंद्रपूर (chandrapur) शहरालगत घुग्घुस मार्गावरील एमआयडीसी परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत (state bank of india) चोरट्यांनी लॉकर तोडून चाैदा लाख पळविले होते. याप्रकरणात दोन संशियत आरोपीांना पोलिसांनी (police) अटक (arrests) केली आहे.

बँकेला सलग दाेन दिवस सुट्या असल्याच्या काळात हा चोरीचा प्रकार घडला होता. बॅंक पूर्ववत सुरु झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना लॉकर तोडलेले दिसले. चोरट्यांनी अनेक दिवसांपासून या बॅंकेवर पाळत ठेवली होती. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दरोड्याची घटना येणार नाही, याची काळजी या चोरट्यांनी घेतली.

त्यानंतर बँकेच्या इमारतीची खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि गॅस कटरने लॉकर तोडले. या गडबडीत लॉकरमधील काही नोटासुद्धा जळाल्या. बॅंकेतील सुरक्षा यंत्रणा आधी बंद केली. त्यामुळे लॉकर सहजरित्या त्यांनी गॅस कटरने कापले. त्यातील चौदा लाख रुपये घेऊन ते पसार झाले.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज संग्रहीत यंत्रणाही स्वतःसोबत घेऊन गेले. अखेर चार दिवसानंतर दोन आरोपींना पोलिसांनी शोधून काढले आहे. हे दाेघे चंद्रपूर शहरातीलच असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Maharashtra News)

बॅंक फोडी प्रकरणात आणखी काही आरोपींचा शोध पोलिस घेत आहे. या बॅंक परिसराच्या मार्गावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही लागले आहेत. त्यामुळे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. तेव्हा घटना घडल्यानंतर एक संशयास्पद वाहन या मार्गाने रात्री गेल्याचे समोर आले.

या चारचाकी वाहनाच्या समोरच्या काचेवर एक वाक्य लिहीले होते. हेच वाक्य पोलिसांना आरोपीपर्यंत घेवून गेले. या वाहनाचा पोलिसांनी शोध घेतला आणि पहिला आरोपी हाती लागला. त्यानंतर दुसऱ्याला अटक केली. दोन्ही अटकेतील आरोपी चुलत भाऊ आहेत. रक्कम मोठी असल्याने पोलीस सावधानतेने सर्व आरोपींचा शोध घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : सावधान! पुढील २४ तास मुसळधार; विदर्भासह 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा थेट 'येलो अलर्ट'

Maharashtra News Live Update: नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार

बीड शहर हादरलं! न्यायाधीशांच्या निवासस्थान परिसरात दोन गटात फ्री-स्टाईल हाणामारी|Video Viral

Maratha Reservation:'मसुद्यावर भूमिका स्पष्ट करा, मगच पुढचा निर्णय'; सरकारचा जरांगेंना अल्टिमेटम

Wednesday Horoscope: बुधवार ठरणार खास! या राशींवर होणार पैशांचा वर्षाव, जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT