solapur, Arrests, mohol
solapur, Arrests, mohol Saam Tv
महाराष्ट्र

Solapur News : महाराष्ट्रसह कर्नाटकातून दुचाकी चाेरणाऱ्यांना अटक; १६ लाख २० हजारांच्या गाड्या जप्त

विश्वभूषण लिमये

Solapur Crime News : मोहोळ, औसा, लातूर, सोलापूर, बीड, आंबेजोगाई, पुणे, पंढरपूर, इंदापूरसह कर्नाटकातून बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणावरून गाड्याचे लॉक तोडून चोरलेल्या गाड्यांची कमी किंमतीत मोहोळ परिसरात विक्री करणाऱ्या दोघांना मोहोळ पोलिसांनी पकडले आहे. या दोघांकडून १६ लाख २० हजार रूपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या २४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. (Maharashtra News)

लातूर जिल्ह्यातील औश्यातून एक व्यक्ती चोरीच्या मोटारसायकली मोहोळमध्ये विक्री करण्याकरिता येत असल्याची माहिती मोहोळ पोलिसांना मिळाली होती. संशयित व्यक्तीस सापळा लावून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव पवनराज चव्हाण असे सांगितले.

विविध ठिकाणी मोटारसायकलची चोरी करून त्यातील काही मोटारसायकली मोहोळ (mohol) मधील मेकॅनिकल खुदबुद्दीन सय्यद (रा. धानोरे, ता. माढा) याच्याकडे विक्रीसाठी दिल्याचे त्याने सांगितले.

पोलिसांनी खुदबुद्दीन सय्यद याला देखील ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दोघांकडून २४ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी वाढवून देण्यात आली आहे अशी माहिती विनोद घुगे (पोलीस निरीक्षक) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election : काँग्रेसचा मोदींवर पलटवार; पाकिस्तान, बिर्याणीचा संबंध जोडत गंभीर आरोप

Expensive country : जगातील ५ सर्वात महागडे देश; राहणे-खाणे आणि फिरायचा खर्च पाहून डोळे फिरतील

Live Breaking News: मुख्यमंत्रीपदाच्या मोहासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Thane Lok Sabha: कोण होणार ठाण्याचा खासदार? ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने

Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात गँगस्टर रोहित गोदाराची एन्ट्री

SCROLL FOR NEXT