Amravati News, Paratwada , Police Saam Tv
महाराष्ट्र

Amravati News : ईदच्या मिरवणुकीत आक्षेर्पाह गाणं, दाेघांना अटक

भाजप खासदार अनिल बोडे यांनी देखील घोषणाबाजीवर आक्षेपही घेतला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Paratwada : परतवाडा (paratwada) येथील आक्षेपार्ह घोषणा प्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगड यांनी दिली. दरम्यान परतवाडा येथील घटना कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचं काम असून हे सरकार उद्धव ठाकरेंचे नव्हे तर शिंदे - फडणवीसांचे सरकार आहे. त्यामुळे चुकीच्या गाेष्टींना थारा देणार नाही असे मत आमदार रवी राणा (ravi rana) यांनी व्यक्त केले. (Breaking Marathi News)

अमरावती जिल्ह्यातील अतिशय संवेदनशील परतवाडा येथे परवा ईद सणानिमित्त काढलेल्या जुलूसमध्ये पोलिसांसमोर "गुनाहे नबी की एक ही सजा सर तनसे जुदा" हा नारा लावण्यात आल्याने खळबळ उडाली. भाजप खासदार अनिल बोडे यांनी या घोषणाबाजीवर आक्षेपही घेतला आहे. (Amravati Latest Marathi News)

दरम्यान या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी दोन जणांना अटक केल्याची माहिती दिली. या प्रकरणातील अन्य संशयित आरोपींचा शोध सुरू असल्याचे बारगड यांनी नमूद केले. ते म्हणाले संशयितांना शोधण्यासाठी एक पथक नेमले आहे. (Maharashtra News)

या घटनेची सखोल चौकशी सुरु आहे. ईद-ए-मिलादच्या बँनरवर एका पोलीसाचा फोटो हाेता. या पोलीस कर्मचारीला मुख्यालयी अटॅच करण्यात आले आहे. त्याची चौकशी अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी करत असल्याची माहिती एसपी बारगड यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

Maharashtra Live News Update: चाळीसगाव शहरात वादानंतर एपीआय भरत चौधरी यांची बदली

Satara Tourism : बोटीतून पाहा सह्याद्रीचे सुंदर नजारे, साताऱ्यात आहे 'हे' खास लोकेशन

SCROLL FOR NEXT