aurangabad crime news, sourabh lakhe, anikta srivastava , police, arrest saam tv news
महाराष्ट्र

Aurnagabad Crime News : स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या जालन्यातील युवतीचा औरंगाबादेत खून

औरंगाबाद शहरात ती स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी राहत हाेती. प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याचे बोलले जात आहे.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तपाडिया

Aurangabad : जालन्यातील एकवीस वर्षीय युवतीचा औरंगाबाद शहरात खुन झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. शहरातील हडको कॉर्नर डिमार्ट जवळ एका खोलीत महिलेचा खून करून मृतदेह घेऊन जात असताना ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी करत युवकास ताब्यात घेतले आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याचे बोलले जात आहे. (Aurangabad Latest Crime News)

अंकिता श्रीवास्तव असे मृत युवतीचे नाव असून सौरभ लाखे यास पाेलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनास्थळावरुन तसेच पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अंकिता हिचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. परंतु ती पतीपासून विभक्त राहत होती. औरंगाबाद शहरात ती स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी राहत हाेती.

सौरभ हा पत्रकार आहे. ताे एका स्थानिक दैनिकात काम करताे. या घटनेनंतर त्याने संबंधित युवतीचा खून केल्याचा संदेश पत्रकार आणि पोलिसांच्या ग्रुपवर पाेस्ट केला. या घटनेमुळं हडकाे परिसरात एकच खळबळ उडाली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

बनावट CBI चा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड; सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर अन्...

Panner Chilli Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूडस्टाईल टेस्टी पनीर चिली, वाचा सोपी रेसिपी

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT