shirdi police, nagar news saam tv
महाराष्ट्र

Shirdi Police News : शिर्डीत तीन लाखांचा गांजा जप्त, एकास अटक; तिघांचा शाेध सुरु

Nagar News : या संशयितांविरुद्ध एनडीपीएस कायदा (कलम 20 ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Shirdi Crime News : शिर्डीचे DySP संदीप मिटके यांना गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनंतर पाेलिसांनी शिर्डी येथील हेलिपॅड रोडवरील एका खोलीत छापा टाकला. या छाप्यात पाेलिसांना मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा सापडला. या प्रकरणी पाेलिसांनी चांगदेव कोते यास अटक केली आहे अन्य तिघांचा शाेध सुरु आहे. (Maharashtra News)

शिर्डी (shirdi) पोलिसांनी एकूण 2 लाख 91 हजार 200 रुपये किमतीचा 20 किलो 800 ग्राम गांजा जप्त केला आहे. त्यासोबतच घटनास्थळावर वजन काटा, प्लास्टिकच्या पिशव्या, खाकी रंगाची चिकट टेप, कटर हे साहित्य देखील जप्त केले आहे.

घटनास्थळावरून पाेलिसांनी चांगदेव कोते यास ताब्यात घेतले असून दत्तात्रय बाबुराव करपे , अनिता दत्तात्रय करपे, शुभम दत्तात्रय करपे या तिघांचा शाेध पाेलिस घेताहेत. या संशयितांविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम 20 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई राकेश ओला (पोलीस अधीक्षक, नगर) , स्वाती भोर (अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप मिटके (डीवायएसपी), पीआय नंदकुमार दुधाळ, एपीआय प्रवीण दातरे, पोलीस कॉन्स्टेबल बिरदवडे , गोंधे, भारमल , गोलवड यांच्या (police) पथकाने केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापूरात मध्यरात्री रक्तरंजित थरार, तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

Accident News : ५ मित्रांचा बर्थडे पार्टीचा प्लान, घराकडे परत येताना काळचा घाला; बर्थ डे बॉयसह ३ मित्रांचा करुण अंत

Hantavirus : कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट

Maharashtra Board SSC Result: निकाल पाहताना वेबसाईट हँग झाली? फक्त एका SMS द्वारे पाहा तुमचे गुण

High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरचा धोका टाळायचा आहे? आजच आहारातून गायब करा 'हे' ५ पदार्थ; आठवड्याभरात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT