आंदोलन मोडीत काढण्यासाठी मराठा बांधवांचे फोन टॅपिंग सुरु  saam tv
महाराष्ट्र

आंदोलन मोडीत काढण्यासाठी मराठा बांधवांचे फोन टॅपिंग सुरु

सरकार आम्हाला घाबरले असून जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे समन्वयकांनी म्हटले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

सोलापूर : आमचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी आमचे फोन टॅपिंग सुरु आहेत. असा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे (Maratha Kranti Thok Morcha) सोलापूरचे समन्वयक राम जाधव, उस्मानाबादचे (Usmanabad) समन्वयक महेश डोंगरे आणि सुनील नगणे यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) स्थगितीनंतर मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलनाचे (Agitation) हत्यार उपसले आहे. सोलापूर (Solapur) येथून मराठा आरक्षण आक्रोश मोर्चाची सुरुवात करण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. (Police are tapping the phones of Maratha brothers to break the agitation)

सोलापूर येथून मराठा आरक्षण आक्रोश आंदोलनासाठी सोलापूर जिल्ह्यासह इतरही काही जिल्ह्यातील मराठा बांधव सहभागी होणार होते. मात्र पोलिसांनी आमचे फोन टॅपिंग करुन चोख बंदोबस्त ठेवला. आंदोलनाात सहभागी होणाऱ्या ज्या मराठा बांधवांना आम्ही संपर्क केला होता, त्यांना तिथेच अडवण्यात आले. असा गंभीर आरोप मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी राज्य सरकारवर केला आहे. तसेच, सरकार आम्हाला घाबरले असून जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे समन्वयकांनी म्हटले आहे.

इतकेच नव्हे तर, आम्हाला पिण्याचे पाणीही मिळू नये अशी व्यवस्था करण्यात आली असून ही दडपशाही असल्याचेही मराठा समन्वयकांनी म्हटले आहे. आम्ही काही दरोडेखोर आहोत का, असा सवाल समन्वयक महेश डोंगरे यांनी केला आहे. मात्र आमच्या घरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले तरीही आम्ही आंदोलन करणारच, आंदोलनात सहभागी होणारच, अशी ठाम भूमिकाही समन्वयक सुनील नगणे व्यक्त केली आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत'हिट अँड रन'चा थरार! मध्यरात्री टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडले

Palghar Tourism : निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचाय; तर पावसाळ्यात पालघरमधील या ठिकांणाना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update: पुण्यातील कोंढवा परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 2 महिन्यातच खड्डे; व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ

Gold Rate Today: सोन्याची किंमत घसरली! प्रति तोळा सोनं ₹1,46,730 वर; वाचा २४k, २२k, १८k सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT