Poisoning from wedding meal in Parbhani, more than 100 civilians hospitalized Saam Tv
महाराष्ट्र

Parbhani : परभणीत १०० हून अधिक जणांना लग्नाच्या अन्नातून विषबाधा

Parbhani Food Poisoning News : जेवण झाल्यानंतर अनेकांना त्रास होऊ लागल्याने त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

परभणी: लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना परभणीत घडली आहे. लग्नात आलेल्या दीडशेहून अधिक वऱ्हाडी (Wedding guests) मंडळींना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाली आहे. परभणीतील (Parbhani) दर्गा रोड येथे रविवारी (१५ जुलै) रात्री एक लग्नसोहळा पार पडला. यात लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळींना लग्नात जेवणं महाग पडलं आहे. जेवण झाल्यानंतर अनेकांना त्रास होऊ लागल्याने त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Poisoning from wedding meal in Parbhani, more than 100 civilians hospitalized)

हे देखील पाहा -

परभणीतीच्या दर्गा रोड परिसरात असलेल्या मेहबूब फंक्शन हॉलमध्ये एक विवाह समारंभ पार पडला. या सोहळ्यात आलेल्या वऱ्हाडींना लग्नातून थेट रुग्णालयात जावं लागलं आहे. लग्न लागल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम सुरु झाला. जे सरुवातील जेवायला बसले त्यांना नंतर पश्चाताप झाला. जेवण झाल्यानंतर काही वेळाने सुमारे दीडशे लोकांना पोटदुखी, उलटी आणि मळमळ होऊ लागली. अनेकांना असह्य त्रास झाला. वेळीच सावधगिरी बाळगत या सर्वांना परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. आता या वऱ्हाडी मंडळींची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या लग्नसोहळ्यात झालेल्या अन्न विषबाधेमुळे लग्नात आलेल्या वऱ्हाडींना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT