PM Modi Road Show In Nashik Saam Digital
महाराष्ट्र

PM Modi Road Show: नाशिकमध्ये १२ जानेवारीला PM नरेंद्र मोदींचा रोड शो, १६ वर्षांनंतर राज्यात होणाऱ्या महोत्सवाला लावणार हजेरी

PM Modi Road Show In Nashik: नाशिकमध्ये १२ ते १६ जानेवारी दरम्यान होणाऱ्या 'राष्ट्रीय युवा महोत्सवा'दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो होणार आहे. १२ जानेवारीला म्हणजेच महोत्सवाच्या उद्घाटनादिवशी मिरची हॉटेल चौक ते तपोवन मैदानातील सभा स्थळापर्यंत तब्बल दीड ते दोन किलोमीटर या रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे.

Sandeep Gawade

PM Modi Road Show

नाशिकमध्ये १२ ते १६ जानेवारी दरम्यान होणाऱ्या 'राष्ट्रीय युवा महोत्सवा'दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो होणार आहे. १२ जानेवारीला म्हणजेच महोत्सवाच्या उद्घाटनादिवशी मिरची हॉटेल चौक ते तपोवन मैदानातील सभा स्थळापर्यंत तब्बल दीड ते दोन किलोमीटर या रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मोदींचे देशभरात तिन दौरे होणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि बिहारचा समावेश आहे.

नाशिकमध्ये २७ व्या 'राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. ५ जानेवारीला या युवा महोत्सवाच्या मॅस्कॉट, लोगो आणि स्लोगनच्या अनावरण सोहळा पार पडला होता. लोगो अनावरण सोहळ्याला राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोड, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, १६ वर्षांनंतर युवा महोत्सवाच्या आयोजनाची महाराष्ट्राला संधी मिळाल्याचं म्हटलं होतं. राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पूर्ण तयार असून यात कुठलीही कमी राहणार नाही. तीन मंत्र्यांनी तिथे मुक्काम ठोकला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधानांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम करण्याचे आपले प्रयत्न आहेत. यासाठी २० समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाचा मोठा प्रचार, प्रसार झाला पाहिजे. हेलिपॅड ते सभा मैदानापर्यंत रोड शोचे आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी दीड ते दोन लाख लोक येण्याची शक्यता, त्यांनी व्यक्त केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Maharashtra News Live Update: नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; बेवारस बॅगची श्वान पथकाकडून तपासणी

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

SCROLL FOR NEXT