Sanjay Raut Saam
महाराष्ट्र

Political News: 'बावनकुळेंच्या घरात औरंगजेबाचे फोटो' ठाकरे गटाच्या खासदाराचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics Latest News: 'बावनकुळेंच्या घरात औरंगजेबाचे फोटो असतील. त्यांच्या खिशातही फोटो असतील', ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा.

Bhagyashree Kamble

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'सौगात - ए - मोदी'ची चर्चा होत आहे. या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. अलिकडेच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सौगात - ए - मोदी'या योजनेवरुन सरकारवर टीका केली होती. ठाकरेंनी केलेल्या टीकेवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल केला होता.

'हिंदुत्वावर बोलण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार उरलेला नाही', असे बावनकुळे म्हणाले होते. बावनकुळेंनी केलेल्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'बावनकुळे यांच्या घरात औरंगजेबाचे फोटो असतील', असा दावा राऊतांनी केला आहे.

बावनकुळे यांच्या घरात औरंगजेबाचे फोटो

'आम्ही जेव्हा कोरोना काळात, मुस्लिमांना मदत करत होतो. अडचणीच्या वेळी मदत करत होतो. तेव्हा औरंगजेबवाले आमच्यावर टीका करत होते. खरंतर बावनकुळे यांच्या घरात औरंगजेबाचे फोटो असतील. त्यांच्या खिशातही औरंगजेब याचे फोटो असतील', असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

शिंदे सेनेवर टीका

'ठाणे की रिक्षा, चेहरे पर दाढी' या गाण्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे. या प्रकरणी कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे, अशी शिंदे सेनेनं मागणी केली आहे. तसेच कामराच्या शोवर बंदी आणावी आणि त्याचं यूट्यूब अकांऊट तपासण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत शिंदे सेनेवर टीका केली आहे.

...ते रेड्याचं दूध काढू शकतात

'शिंदे सेना कोणतीही मागणी करू शकेल. शिंदे गटाला मागणी करायला काहीच जात नाही. ते रेड्याचं दूध काढू शकतात. ते बैलाचेही दूध काढू शकतात', अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

'मुळात या देशात कायदा आहे. आम्ही काही प्रमाणात स्वातंत्र्य टिकवून ठेवलेलं आहे. आमच्यासारख्या संघर्ष करणाऱ्या अनेक लोकांनी स्वातंत्र्य टिकवून ठेवलं आहे. तुमच्यावर कुणीतरी टिप्पणी केली, म्हणून त्याचं यु्ट्यूब चॅनेल बंद करायचं. मग जर उद्या सरकार बदललं आणि तुमच्या विरोधातील कार्यकर्ते यांनी हीच भूमिका घेतली तर कसं व्हायचं?' असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

अमित शहा यांच्या पलिकडे शिंदेंना काहीच दिसत नाही

'शिंदेंच्या लोकांना माहित नाही. हा देश खुप मोठा आहे. त्यांना त्यांचा देश अमित शहा यांच्या पलीकडे दिसत नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. जोपर्यंत अमित शहा यांचे छत्र त्यांच्या डोक्यावर आहे. तोपर्यंत त्यांचं बोलणं असंच सुरू राहिल. पण रामकृष्ण आले गेले, तसे मोदी - शहा येतील आणि जातील', असंही राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT